Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चार मित्र आणि शिकारी

चार मित्र आणि शिकारी
, मंगळवार, 23 जानेवारी 2024 (17:55 IST)
खुप वर्षपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात चार मित्र राहत होते. त्या चौघांचा स्वभाव खूप वेगळा होता. परंतू ते घट्ट मित्र होते आणि कोणी एक जर संकटात सापडले तर त्याला सर्व मदत करायचे. ते चार मित्र होते उंदिर, कावळा, हरिण, कासव. 
 
एका दिवशी उंदिर, कावळा, हरिण झाडाखाली गप्पा करत होते. अचानक ओरडण्याचा आवाज आला. हा तर त्यांचा मित्र कासवाचा आवाज होता. तो शिकारीच्या जाळ्यात फसला होता. हरिण म्हणाले की,अरे आता आपण काय करायचे. उंदिर म्हणाला की, चिंता करू नका माझ्याजवळ एक योजना आहे. मग हरिण आणि कावळ्याने उंदिरची योजना ऐकली आणि ठरवले. 
 
हरिण शिकारीच्या रस्त्याने पळाले आणि त्याला पाहून पडून गेले जसकी ते मरण पावले. या दरम्यान कावळा तिथे पोहचला आणि हरिणाचे मांस खाण्याचे नाटक करायला लागला. शिकारी जेव्हा जाळ घेवून घरी जात होता तेव्हा त्याची नजर त्या पडलेल्या हरिण व कावळ्यावर गेली. तो मृत हरिणला पाहून आनंदित झाला. हा हरिण तर मेलेला आहे. याचे स्वादिष्ट मांस खूप दिवस पुरेल असे तो स्वतःशी बोलू लागला. 
 
तो कासव असलेले जाळ खाली ठेवून हरणाच्या जवळ गेला. तेव्हा झाडांच्या मागे लपलेल्या उंदिरने जाळ कुरतडले आणि कसवाला मोकळे केले. कावळ्याने कसवाला मोकळे झालेले पाहिले तर तो मोठयाने कावकाव करून उडून गेला. तेव्हाच हरिण उठून जोर्यात धावले. शिकारी त्याला पाहत चकित झाला. तो मन उदास करीत कसवाजवळ आला तर तिथे कुरतडलेले जाळ या व्यतिरिक्त काहीच नव्हते. कासव पण गायब होते. त्याने विचार केला काश! मी एवढे लालच करायला नको होते. ते चार मित्र योजना यशस्वी झाली म्हणून आनंदित होते. त्यांच्या योजनेने सर्व मित्रांचा जिव वाचला होता. त्यांनी शपथ घेतली की, भविष्यात पण ते एकत्रित राहतील.
 
तात्पर्य 
एकतामध्ये बळ असते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ultra Processed Food अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचा तुमच्या शरीरावर आणि मेंदूवर काय परिणाम होतो?