बऱ्याच वर्षांपूर्वी एक भिकारी नंदनगरात भुकेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत लोकांकडून खाण्यासाठी भिक्षा मागत होता. एक माणूस त्याला खाण्यासाठी काही भाकरी देतो. भाकरी साठी भाजीचा शोध घेत तो एका खानावळी जवळ जातो आणि भाकरी साठी भाजी मागतो. तो दुकानदार त्याला हाकलवून लागतो. तो खूप दुखावतो आणि लपून त्या खानावळीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीशी जाऊन उभा राहतो. त्या खिडकी जवळ भाजीचे गरम गरम मोठे मोठे पातेले ठेवलेले असतात. तो विचार करतो की जर या भाकरी ला भाजीच्या वाफेवर ठेवले तर या भाकरींमध्ये भाजीची चव येऊ लागेल आणि मग भाकरी खाता येईल. असं विचार करून तो भाजीच्या येणाऱ्या वाफेवर भाकरी ठेवतो. तेवढ्यात त्या खानावळीचा मालक तिथे येतो आणि त्याला असं करताना बघतो. तो त्याला भाजीची चोरी केली म्हणून धरतो. तो भिकारी त्याला मी फक्त भाजीची वाफ घेतली भाजी घेतली नाही असे स्पष्ट पणे सांगतो तरी ही तो मालक त्याला म्हणतो की जरी तू भाजी घेतली नाही तरी ही त्याचा वास घेतला आहे तुला त्याचे पैसे द्यावे लागतील.
तो भिकारी त्याला घाबरत म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावर तो मालक त्याला धरून मुल्ला नसरुद्दीन कडे नेतो आणि घडलेले सर्व सांगतो.
मुल्ला नसरुद्दीन सर्व काही शांतपणे ऐकतात आणि मालकाला म्हणतात की तुला तुझ्या भाजीच्या वासाचे पैसे पाहिजे? मालक म्हणतो हो मला माझ्या भाजीच्या वासाचे पैसे पाहिजे.
मुल्ला नसरुद्दीन म्हणतात की मी स्वता तुला त्याचे पैसे देणार "असं ऐकल्यावर मालक खुश झाला. मुल्ला नसरुद्दीन म्हणाले की मी नाण्याच्या आवाजाने आपल्याला वासाची किंमत देणार. असं म्हणत त्यांनी आपल्या खिशातून नाण्याची पिशवी काढतात आणि परत ठेवतात. हे बघून मालक त्यांना म्हणतो की आपण ही कशी काय किंमत दिली आहे. मुल्ला नसरुद्दीन म्हणतात ज्या प्रमाणे तुझ्या भाजीची वास भिकाऱ्याने घेतली आहे त्याच प्रमाणे मी देखील तुला नाण्याचा आवाज ऐकवून भाजीच्या वासाची किंमत मोजली आहे. जर भिकाऱ्याने काही भाजी घेतली असती तर तुला काही नाणे दिले गेले असते. मुल्ला नसरुद्दीन चे म्हणणे ऐकून मालक मान खाली घालून तिथून निघून जातो. भिकारी देखील मुल्ला नसरुद्दीन चे आभार मानून आपल्या वाटेला निघून जातो.
शिकवण- बुद्धिमत्ता आणि हुशारीने प्रत्येक समस्या सोडविली जाऊ शकते. जसे की मुल्ला नसरुद्दीन ने मालकाशी केले.