Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंचतंत्र कहाणी : लोभी कोल्हा

The Fox
, शुक्रवार, 30 ऑगस्ट 2024 (12:39 IST)
एका घनदाट जंगलात एक कोल्हा राहायचा. खूप दिवसांपासून कोल्हा भुकेला होता. तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता. खूप फिरला तरी देखील त्याला खाण्यास काहीही मिळाले नाही. तेव्हा त्याची नजर एका बगीच्यावर गेली. बगीच्या खूप सुंदर आणि हिरवागार होता. त्या बगीच्यातून खूप गोड वास येत होता. त्याला जाणीव झाली की आता त्याची वाट पाहणे थांबेल. तो जलद गतीने बगीच्याकडे पाऊले उचलायला लागला. 
 
कोल्हा जसा बागेमध्ये पोहचला तसे त्याला दिसले की, सुंदर असे गोड द्राक्ष झाडाला लटकले आहे. द्राक्ष पाहून त्याचे डोळे चमकायला लागले. मनोमन कोल्हा आनंदित झाला. 
 
त्याने द्राक्षांना पाहून पटकन द्राक्ष घेण्यासाठी उडी मारली. पण कोल्हा द्राक्षांपर्यंत पोहचू शकला नाही. व जोऱ्यात जमीवर कोसळला. त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. त्याने विचार केला की परत प्रयत्न करावा.
 
कोल्हा परत एकदा उठला व द्राक्षांच्या दिशेने परत मोठी उडी घेतली. पण त्याचा हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला. पण त्याने हार मनाली नाही. तो स्वतःला म्हणाला की, माझे दोन प्रयत्न अयशस्वी झाले पण आता हा प्रयत्न यशस्वी होईल. यावेळेस मला यश नक्की मिळेल.
  
आता परत त्याने खूप उंच उडी मारली. पण आता देखील त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. व तो जोऱ्यात जमिनीवर कोसळला.
 
एवढे प्रयत्न केल्यानंतर देखील त्याला एकही द्राक्ष मिळाले नाही. आता त्याने द्राक्ष मिळवायचा मोह सोडला आणि हार स्वीकार केली. आपले अपयश मान्य करण्यासाठी तो स्वतःला म्हणाला की, द्राक्षे आंबट आहे. म्हणून मी यांना खाऊ शकत नाही. 
 
तात्पर्य- कधीही कोणत्याही गोष्टीचा अति मोह करू नये. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काही मिनिटांतच काचेच्या ग्लासवरील पांढरे डाग निघून जातील या टिप्स अवलंबवा