सुंदरबन नावाचे एक सुंदर विलोभनीय जंगल होते. तिथे अनेक पशु , पश, पक्षी अगदी आनंदाने राहायचे. हळू हळू सुंदरबनचे सौंदर्य नष्ट व्हायला लागले. पशु-पक्षी सुद्धा तिथून निघायला लागले म्हणजे दुसऱ्या जंगलात ते प्रस्थान करायला लागले. कारण हे होते की, सुंदरबन मध्ये अनेक वर्षांपासून पाऊस पडला न्हवता. ज्यामुळे जंगलामध्ये पाण्याची कमी भासू लागली. तळे, सरोवर, नदी कोरड्या पडू लागल्या. झाडांची-झुडपांची हिरवळ नष्ट होऊ लागली. यामुळे पशु-पक्षांना समस्या येऊ लागल्या. सर्व ते जंगल सोडून दुसऱ्या जंगलात जात होते, तेव्हाच गिधाड या पक्षांनी पहिले की आकाशात काळे ढग जंगलच्या दिशेने येत आहे.
त्यांनी सर्वांना सांगितले की काळे ढग जंगलच्या दिशेने येत आहे. आता पाऊस पडेल. हे ऐकताच सर्व पशु-पक्षी जंगलच्या दिशेने परत यायला लागले. काही क्षणांतच पाऊस कोसळू लागला. तसेच पाऊस दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात कोसळला. सर्व पशु-पक्षी पाऊस थांबल्यानंतर आपल्या आपल्या घरातून बाहेर आले. तेव्हा त्यांनी पाहिले की तलावात खूप पाणी भरले होते. सर्व झाडांना नवीन पाने आली होती. सर्व प्राणी मंडळी खुश झाली व सर्वानी उत्सव साजरा केला. सर्वांचे मन अगदी प्रसन्न झाले.
बदके आता तलावात पोहत होती, हरीण इकडे तिकडे धावत होते आणि आनंदोत्सव साजरा करत होते तसेच बरेच पप्पी-दादुर एकत्र नवीन राग शोधत होते. अशा प्रकारे सर्व प्राणी, पक्षी आनंदित झाले. आता सर्वांनी दुसऱ्या जंगलात जाण्याचा विचार सोडून दिला होता आणि आपल्या घरात आनंदाने राहू लागले होते.
तात्पर्य : संयमाचे फळ गोड असते.