Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंचतंत्र कहाणी : मूर्ख कासव

Kids story a
, बुधवार, 31 जुलै 2024 (14:43 IST)
एका तलावाच्या किनारी एक कासव राहत होते आणि त्याच तळ्यामध्ये एक दोन हंस देखील राहत होते. या कासवामध्ये आणि हंसांमध्ये मैत्री झाली होती. हंस दूर-दूर पर्यंत उडत जायचे आणि ऋषी कडून ज्ञान संपादन करून येऊन कासवाला ऐकवायचे. पण कासव खूप बोलायचे. एक क्षण सुद्धा गप्प राहायचे नाही. एक दिवस हंसांनी ऐकले की कोरडा दुष्काळ पडणार आहे. तर त्यांनी ही गोष्ट लागलीच कासवाला जाऊन सांगितली. 
 
तसेच कासव त्यांना म्हणाले की मित्रांनो मला देखील या परिस्थितीतून वाचावा. हंस हो म्हणाले. मग हंस एक काठी घेऊन आले आणि म्हणाले की आम्ही दोघे चोचीने काठीच्या बाजूला पकडू व तू काठीचा मधील भाग तोंडात पकडशील. या प्रकारे आपण दुसऱ्या तलावाजवळ जाऊया. पण एक गोष्ट लक्षात ठेव बोलू नकोस. कासवाला ही गोष्ट समजवल्यानंतर ते तिघे उडू लागले. रस्त्यामध्ये एक गाव लागले व आकाशातील हे दृश्य पाहून मुले ओरडायला लागली व म्हणाली की ते पहा उडणारे कासव. कासव मुलांचे आवाज ऐकून गप्प राहू शकले नाही. व बोलण्यासाठी आपले तोंड उघडले. व तोंड उघडताच ते खाली पडले व त्याच्या मृत्यू झाला. 
 
तात्पर्य : आपण कधीही बोलण्यापूर्वी आधी परिस्थिती समजून घ्यावी. कारण विनाकारण बोलणे महागात पडू शकते. म्हणून सांगितले तरच बोलावे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझ्या छकुलीचे डोळे