Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंचतंत्र : साधू आणि चोराची गोष्ट

Kids story
, सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)
Kids Story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गावातील मंदिरात देव शर्मा नावाचा एक प्रतिष्ठित साधू राहत होते. गावातील लोक त्यांचा आदर करायचे. साधूला त्यांच्या भक्तांकडून विविध प्रकारचे कपडे, भेटवस्तू, खाद्यपदार्थ आणि पैसे दान म्हणून  मिळायचे. ते सर्व विकून साधूने भरपूर पैसा जमा केले होते.
 
साधू आपले पैसे नेहमी एका झोळीमध्ये ठेवायचे. त्याच गावात एक चोर देखील राहत होता. त्या चोराची नजर साधूच्या पैशांवर होती. चोर नेहमी साधूचा पाठलाग करत असे, परंतु साधूने आपली पैशाने भरलेली झोळी कधीही स्वतापासून दूर ठेवली नाही त्यामुळे चोराला ती झोळी चोरता आली नाही. एक दिवस चोराने वेष धारण केले. व 
साधूकडे गेला. त्याने साधूला विनंती केली की त्याला ज्ञान मिळवायचे आहे म्हणून मला शिष्य म्हणून स्वीकारावे. यावर साधूने त्या वेष धारण केलेल्या चोरावर विश्वास ठेवला आणि त्याला आपले शिष्य बनवले. 
 
आता चोर मंदिराच्या साफसफाईसह इतर सर्व कामे करत असे आणि चोराने साधूची चांगली सेवा केली आणि लवकरच साधूचा विश्वास संपादन केला. एके दिवशी जवळच्या गावात साधूला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले, साधूने ते आमंत्रण स्वीकारले आणि ठरलेल्या दिवशी साधू आपल्या शिष्यासह कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले. वाटेत एक नदी लागली आणि साधूंना स्नान करण्याची इच्छा झाली. साधूने झोळी नदीच्या काठावर ठेवली आणि शिष्याला त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. व साधू स्नान करण्यासाठी नदीमध्ये उतरले. चोर अनेक दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होता. साधू नदीत गेल्याचे पाहून त्याने पैशांनी भरलेली झोळी उचलली व पळून गेला. बाहेर आल्यावर साधूने पहिले की, झोळी आणि शिष्य दिसत नाही आहे तेव्हा त्यांना सर्व प्रकार समजला व त्यांना त्या चोरावर विश्वास ठेवल्याचा पश्चाताप झाला. 
 
तात्पर्य : कोणाच्याही गोड बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Girl Names Born On Monday सोमवारी जन्मलेल्या मुलींची नावे