Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा म्हतारीने शिवाजींवर फेकला दगड

जेव्हा म्हतारीने शिवाजींवर फेकला दगड
एकदा छत्रपति शिवाजी महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. शिवाजींना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागले परंतू त्यांना कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाघून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता. 
 
शिवाजींनी म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली “क्षमा असावी महाराज, मी तर या आंब्याच्या झाडावरुन काही आंबे तोडू पाहत होते परंतू म्हातारपणी या झाडावर चढणे तर शक्य नाही म्हणून दगड मारुन फळं तोडत होते पण त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला. 
 
निश्चितत कोणीही साधारण व्यक्तीने अश्या चुकीवर अधिक क्रोधित होऊन चुक करणार्‍याला शिक्षा दिली असते. परंतू शिवाजी महाराज तर महानतेतचे प्रतीक होते, त्यांनी असे मुळीच केले नाही.
 
त्यांनी विचार केला की ” एक साधारण झाडं एवढं सहनशील आणि दयाळू असू शकतं की दगडाचा मार खाऊन देखील मारणार्‍याला गोड फळं देतं तर मी तर एक राजा आहे आणि राजा सहनशील आणि दयाळू का नसू शकतो? आणि असा विचार करत महाराजांनी त्या म्हातारीला काही स्वर्ण मुद्रा भेट म्हणून दिल्या.
 
तर मित्रानों सहनशीलता आणि दया कमजोर नव्हे तर वीरांचे गुण आहेत. आज लोकं लहान-सहान गोष्टींवर क्रोधित होऊन एकमेकांचे प्राण घेऊ बघता, मारहाण करतात अशात शिवाजी महाराजांचा हा प्रसंग निश्चित आम्हाला सहिष्णु आणि दयाळू असावं याची जाणीव करवून देतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरड्या खोकखल्यावर घरगुती उपाय