Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेनालीराम आणि रंगीत नखे

तेनालीराम आणि रंगीत नखे
, शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:54 IST)
विजयनगर राज्याचे राजा कृष्णदेवराय पक्षी आणि प्राण्यांना खूप प्रेम करायचे. एके दिवशी पक्षी पकडणारा भेलिया त्यांच्या दरबारात आला. त्याच्याकडे एक पिंजरा होता त्या पिंजऱ्यात एक अतिशय देखणा आणि रंगीत विचित्र प्रकाराचा पक्षी होता.

तो भेलिया राजाला म्हणाला -' महाराज मी आपल्यासाठी असा दुर्मिळ पक्षी जंगलातून पकडून आणला आहे. हा खूप सुंदर गातो आणि पोपटा प्रमाणे बोलतो देखील. हा मोराप्रमाणेच रंगीत आहे आणि त्याच्या सारखेच नाचू देखील शकतो. मी असा हा दुर्मिळ पक्षी आपल्याला विकायला घेऊन आलो आहोत. 
 
राजा कृष्णदेव रायने त्या पक्षीकडे बघून म्हटले-' होय, खरोखरच दिसायला हा फार विचित्र आणि दुर्मिळ पक्षी आहे. या साठी तुला योग्य अशी किंमत दिली जाईल. 
 
राजाने त्या भेलियाला 50 सोन्याच्या नाणी दिल्या आणि त्या पक्ष्याला आपल्या महालाच्या बागेत ठेवायला सांगितले. 

तेवढ्यात तेनालीराम आपल्या जागेवरून उठले आणि म्हणाले महाराज मला वाटत नाही की हा पक्षी मोरा समान पावसात नाचू शकतो.  मला तर हे वाटत आहे की ह्या पक्ष्याने बऱ्याच वर्षांपासून अंघोळ देखील केली नाही. 
 
तेनालीरामची गोष्ट ऐकून भेलिया घाबरून गेला आणि दुखी स्वरात होऊन राजाला म्हणाला-' महाराज मी एक गरीब पक्षी पकडणारा माणूस आहे. पक्षी पकडून विकणे हाच माझा व्यवसाय आहे. माझे घर देखील या मुळे चालतो. मला असे वाटते की पक्ष्यांच्या ज्ञानावर आरोप करणे सर्वथा अनुचित आहे. मी गरीब आहे म्हणून तेनालीराम मला खोटं सिद्ध करीत आहे.
 
भेलियाचे म्हणणे ऐकून महाराज देखील तेनालीरामला नाराज होऊन म्हणाले ' तेनाली आपले असे बोलणे योग्य नाही. आपण हे सिद्ध करू शकता का? 
 
होय, महाराज मी हे सिद्ध करू शकतो. असे म्हणत तेनालीरामने एक ग्लास पाणी त्या पिंजऱ्यात असलेल्या पक्ष्याच्या अंगावर टाकले पक्षी ओला झाला आणि त्याच्या वर पडलेले पाणी रंगीत झाले आणि त्या पक्ष्याचा रंग फिकट तपकिरी झाला. महाराज तेनालीला आश्चर्याने बघू लागले. 

तेनाली म्हणाले की महाराज - ' हा दुर्मिळ पक्षी नसून एक रानटी कबुतर आहे.'
'पण तेनालीराम आपल्याला हे कसे कळले की हा रानटी कबुतर आहे दुर्मिळ पक्षी नाही'. आणि ह्याला रंगले आहे ? 'महाराज त्या भेलियाच्या नखांवरून. पक्ष्याचा रंग आणि त्या भेलियाच्या नखाचा रंग सारखाच आहे त्या वरून मला समजले.
 
आपले भिंग फुटले आहे हे बघून तो भेलिया पळू लागला, पण सैनिकांनी त्याला पकडून घेतले. राजाने त्याला फसवेगिरीच्या गुन्ह्यात तुरुंगाची शिक्षा दिली आणि दिलेल्या 50 स्वर्ण मुद्रा तेनालीरामला दिल्या आणि राजाने तेनालीरामचे आभार मानून धन्यवाद दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता, व्हिटॅमिन सी चे जास्त सेवन देखील हानिकारक आहे