Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Cooking Hacks: अन्नातून जळका वास काढून टाकण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Cooking Hacks: अन्नातून जळका वास काढून टाकण्यासाठी या टिप्स अवलंबवा
, गुरूवार, 3 मार्च 2022 (11:10 IST)
घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण बनवण्यासाठी आपण स्वयंपाकघरात तासनतास काम करत आहात. पण थोड्याशा निष्काळजीपणामुळे जर अन्न भांड्याच्या तळाशी लागते आणि त्याला येणाऱ्या जळका वास तर आपली  मेहनत आणि आपला मूड दोन्ही बिघडतो. अशा परिस्थितीत, जर आपल्या सोबत असे कधी घडले तर ते टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा. 
 
अन्न पूर्णपणे जळले, तरच त्यातून जळका वास येईलच असे नाही. कधी-कधी थोड जळल्यावरही वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत स्वयंपाकघराशी संबंधित हे काही सोपे हॅक आपली समस्या दूर करू शकतात. कसे ते जाणून घेऊया. 
 
 वरणाचा जळलेला वास दूर करण्यासाठी  उपाय-
अनेकदा प्रेशर कुकरमध्ये वरण शिजवताना पाणी कमी असल्यास वरण खाली लागते. अशा स्थितीत कुकर मधील डाळ डावच्या साहाय्याने बाहेर काढा, थंड करा आणि तासभर फ्रीजमध्ये ठेवा. तासाभराने गॅसवर कढई ठेवा आणि त्यात कांदे, टोमॅटो टाकून डाळ घाला. यानंतर वरून तूप आणि हिंग टाका. असे केल्याने जळलेला वास पूर्णपणे नाहीसा होतो.
 
चिकनचा जळणारा वास दूर करण्याचा उपाय-
चिकनची चव त्याच्या रस्सामध्ये असते. चिकन बनवताना रस्सा जळला तर आपली सर्व मेहनत वाया जाते. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा चिकन ग्रेव्ही जळते तेव्हा त्याला वरून काढून त्यात हलके दूध मिसळा. लक्षात ठेवा जर चिकन जास्त जळलेले असेल तर हा उपाय करू नका. अशा स्थितीत अर्धा कप दूध घालून परत शिजवा. जळक्या वासाची समस्या दूर होईल.
 
रस्सासोबत भाजीतून जळल्याचा वास असा काढा- रस्सा असलेल्या भाजीतून जळल्याचा
वास येत असेल तर सर्वप्रथम कढईतून काढून वेगळ्या भांड्यात ठेवा. आता गॅसवर भांडे ठेवा आणि त्यात भाज्या घाला. भाजीवर एक-दोन चमचे ताक आणि दही टाकल्यावर थोडा वेळ शिजवा. 5 ते 10 मिनिटांत गॅस बंद करा. जळणारा वास पूर्णपणे निघून जाईल. 
 
सुक्या भाजीचा जळण्याचा वास असा प्रकारे काढून टाका-
सुकी भाजी जळली तर सर्वात आधी चांगली असलेली भाजी वरून -वरून काढून ती ताटात वेगळी करा. आता दुस-या कढईत 2 चमचे बेसन घालून हलके भाजून त्यात कोरड्या भाज्या मिक्स करा. असे केल्याने भाजीतून जळण्याचा वास अजिबात येणार नाही.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जीवनात येणारे आव्हाने एक वरदान आहेत