Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परफेक्ट केक बनवण्यासाठी या मूलभूत टिप्स अवलंबवा

परफेक्ट केक बनवण्यासाठी या मूलभूत टिप्स अवलंबवा
, शनिवार, 25 डिसेंबर 2021 (14:30 IST)
केक बनवताना सर्वात मोठी अडचण समोर येते की अनेक प्रयत्न करूनही केक फुगत नाही, जर आपल्या सोबतही असेच घडत असेल तर परफेक्ट केक बनवण्यासाठी या टिप्स अवलंबवा - 
 
* केक बनवताना लक्षात ठेवा की पीठ जास्त जुने नसावे.
 
* साखर अगदी बारीक करून चाळणीतून बारीक पिठात दोन-तीन वेळा चाळून घ्या.
 
* मैदा एकाच दिशेने फेणून घ्या, केक चांगला फुगेल.
 
* केक बेक करण्यापूर्वी, ओव्हन प्रीहीट करा जेणेकरून तापमान समान राहील.
 
* बेकिंग डिशमध्ये ओलावा नसावा, यासाठी ते चांगले कोरडे करा अन्यथा केक नीट फुगणार नाही.
 
* फ्रिजमधून केकच्या वस्तू थोड्या आधी काढा आणि बाहेर ठेवा जेणेकरून त्यांचे तापमान सामान्य राहील.
 
* जर केक बनवताना दूध घालायचे असेल तर ते थंड घालू नका, दूध  कोमट घाला.
* केक चांगल्या प्रकारे फुगण्यासाठी, एक दिवस आधी मिश्रण फेणून ठेवा.
 
* केकमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर टाकू नका, अन्यथा केक फाटेल.
 
* केक बेक करताना गॅस एक सारखेच ठेवा. इलेक्ट्रिक ओव्हनमध्ये केक बेक  करत असल्यास, तापमान 300 अंशांपेक्षा कमी ठेवू नका.
 
* बेकिंग डिशमध्ये केक ठेवण्यापूर्वी, ते ग्रीस करा जेणेकरून केक काढणे सोपे होईल.
*जर केक जास्त शिजला असेल किंवा थोडा जळला असेल तर धारदार चाकूने वरचा भाग कापून घ्या आणि आयसिंग बनवा.
आइसिंगसाठी फ्रेश क्रीम आणि आयसिंग वापरा आणि आयसिंग सेटपासूनच आइसिंग बनवा.
 
* जर दोन-तीन केक बनवायचे असतील तर ते एकत्र बनवू नका केक  एक एक करून बनवा.
 
* केक शिजला आहे की नाही हे तपासण्यासाठी केकच्या मध्यभागी एक स्वच्छ सुई घाला. जर केक सुईला चिकटला तर याचा अर्थ असा होतो की तो शिजला नाही, जर तो चिकटला नाही तर याचा अर्थ केक तयार आहे.
 
या काही टिप्स अवलंबवून आपण परफेक्ट केक बनवू शकता. 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाइटसूट निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा, कोणतीही अडचण येणार नाही