स्वयंपाकघरातील काही लहान लहान किचन टिप्स आपले काम सोपे करतात. किचन टिप्सचे सर्वात मोठे फायदा म्हणजे ते तुमचे काम सोपे करतात . तसेच अन्न खराब होत नाही. अशा काही टिप्स आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतील-
1 सफरचंद काळे पडणार नाही- बऱ्याच वेळा सफरचंद कापल्यानंतर काही वेळाने काळे पडतात. सफरचंद ताजे राहण्यासाठी आणि ते काळे होणार नाही यासाठी आपण ही युक्ती अवलंबू शकता. यासाठी कापलेल्या सफरचंदाचे तुकडे थंड पाण्यात मीठ आणि लिंबू टाकून बाहेर काढून घ्या.असं केल्याने सफरचंद बराच काळ ताजे राहतील. ते काळे पडणार नाही.
2 लसूण सहज सोलण्यासाठी- लसणाच्या पाकळ्या थोड्या वेळासाठी गरम पाण्यात टाका. नंतर काही वेळाने आपण लसूण सोलायला घेतल्यावर तेव्हा कोणतेही परिश्रम न करता फक्त वरचा भाग कापल्यावर संपूर्ण साल निघून जाईल.
3 राजमा भिजवायला विसरलात तर हे काम करा - सर्वप्रथम राजमा नीट धुवून स्वच्छ करा. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये पाणी टाका आणि त्यात 1 चमचा मीठ घाला. नंतर त्यात एक शिट्टी घेतल्यानंतर ती थंड होण्याची वाट पहा. नंतर त्यात 1कप बर्फाचे तुकडे टाका. मीठ आणि बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे राजमा लवकर गळतो. यानंतर कुकरमध्ये पुन्हा शिटी लावून गॅस मंद करून 5-7 मिनिटे शिजवा. या युक्तीचा अवलंब केल्यास आपले काम सहज होईल.
4 कुकरच्या झाकणात डाळ चिकटणार नाही। -जेव्हाही आपण डाळ शिजवतो तेव्हा कुकरच्या झाकणात डाळ चिटकते. ही युक्ती आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी ठेवताना त्यात एक लहान स्टीलची वाटी घाला. असे केल्याने डाळ उकळून बाहेर पडणार नाही आणि कुकरच्या शिट्टीतून फक्त वाफ येईल.डाळ बाहेर येणार नाही.