rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हळदीत ओलाव्यामुळे पांढरे कीटक झाले असतील तर या टिप्स अवलंबवा

Remedy if moisture has caused white insects in turmeric
, शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (14:37 IST)
बारीक केलेल्या हळदीमध्ये ओलाव्यामुळे पांढरे किडे होतात ही सामान्य गोष्ट आहे. तसेच हे किडे हाऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही हळदीतील ओलाव्यामुळे होणारे पांढरे किडे थांबवू शकतात. तसेच हळद दीर्घकाळ सुरक्षित ठेऊ शकतात. 
 
1. हळद नीट वाळवावी- 
हळदची पावडर तयार करण्यापूर्वी, ती पूर्णपणे कोरडी करावी. तसेच हळद नीट वाळवली गेली तर त्यात ओलावा राहत नाही, व ज्यामुळे किडे निर्माण होत नाही.
 
2. हवाबंद कंटेनर किंवा झिप लॉक बॅगमध्ये साठवा-
हळद पावडर साठवण्यासाठी नेहमी हवाबंद कंटेनर किंवा झिप लॉक बॅगचा वापर करावा. हे ओलावा आत जाण्यापासून थांबवते आणि कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही.  
 
3. कडुलिंबाची पाने वापरा-
हळदीच्या डब्यात कडुलिंबाची काही कोरडी पाने टाकावी. कडुलिंबातील नैसर्गिक गुणधर्मांमुळे कीटक दूर राहतात.  
   
4. हळद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा-
जर तुमची हळद लवकर खराब होत असेल तर हळद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. तसेच हळद थंड ठिकाणी ठेवल्यास कीटक आणि आर्द्रतेची निर्माण होत नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सदैव सैनिका...