बऱ्याचदा स्वयंपाक करताना काहीवेळेस भाज्यांमध्ये खूप मीठ घातले जाते. अशा परिस्थितीत त्या भाजीची चव देखील खराब होते. तसेच अश्यावेळेस अनेकांना प्रश्न पडतो की, काय करावे? तर आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे कालवणात जास्त झालेले मीठ नक्कीच कमी करता येईल. व पदार्थ वाया जणार नाही. तर चला जाणून घ्या ट्रिक.
व्हिनेगर किंवा लिंबाचा रस-
पदार्थामध्ये वाढलेले मीठ आंबट चव घालून संतुलित करता येते. याकरिता भाजीमध्ये एक ते दोन चमचे व्हिनेगर किंवा एक चमचा लिंबाचा रस घालावा. ज्यामुळे नक्कीच फायदा होईल.
बटाटा-
अनेक वेळेस बनवलेल्या भाजीमध्ये मीठ जास्त पडते. अशा परिस्थितीत एका बटाट्याचे दोन तुकडे करून भाजीमध्ये घालावे. बटाटा भाजीतील अतिरिक्त मीठ शोषून घेतो. व भाजीची चव देखील बिघडत नाही.
साखर किंवा मध-
भाजीमध्ये किंवा कोणत्याही कालवणात मीठ जास्त झाल्यास भाजीमध्ये थोडी साखर आणि मध घालावे. पण जास्त प्रमाणात घालू नये. नाहीतर भाजीची चव गोड होऊ शकते.
पीठ-
भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून भाजीत घालावे. पिठाचे गोळे भाजीत मीठ नियंत्रित करतात. व पिठाच्या गोळ्यांनी रस्साही घट्ट होतो.
बेसन-
कालवणात मीठ जास्त प्रमाणात पडल्यास 1 चमचा हलके भाजलेले बेसन घालावे. मीठ संतुलित करते. तसेच रसाळ भाज्यांमध्ये बेसनाचा वापर करावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik