Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोथिंबीर आणि पुदिना ताजे राहावे म्हणून या ट्रिक अवलंबवा

coriander
, शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (16:17 IST)
उन्हाळा असो किंवा पावसाळा पालेभाज्या सांभाळणे थोडे कठीण जाते. उन्हाळयात पालेभाज्या कोरड्या पडतात तर पावसाळ्यात त्या लवकर खराब होतात. तसेच कोथिंबीर आणि पुदिना जर व्यवस्थित स्टोर केला गेला नाही तर तो लवकर खराब होतो. याकरिता आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोथिंबीर आहे पुदिना जास्त दिवस ताजा ठेऊ शकाल. 
 
कोथिंबीर आणि पुदिना धुवून वाळवणे-
सर्वात आधी कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्यावा जेणेकरून त्याची मानती निघून जाते. यानंतर स्वच्छ कपड्यांवर पसरवून ठेवावे. ओले फ्रिजमध्ये ठेवल्यास ते लवकर सडून जातात. 
 
कोथिंबीर आणि पुदिना रोल करा-
पूर्णपणे वाळल्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना एका कापडात किंवा पेपर टॉवेल मध्ये रोल करा. यामुळे पानांचे कंटेंट सुरक्षित राहून पाने ताजी राहतात. 
 
हवाबंद कंटेनर वापरा-
कोथिंबीर आणि पुदिना पाने हवाबंद डब्यात ठेवावी. ज्यामुळे हवेचा प्रवेश कमी होतो आणि या भाज्या दीर्घ वेळेसाठी ताज्या राहतात. तसेच हा हवाबंद कंटेनर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. थंड तापमान पानांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच थंड तापमान सुगंध टिकवून ठेवण्यास मदत करते.
 
पेट्री डिशचा वापर-
कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने हे पेट्री डिशमध्ये ठेवा आणि वर पेपर टॉवेल ठेवा. यामुळे ते ओलावा शोषून घेते आणि पाने दीर्घकाळ ताजे ठेवते. पानांवर पेपर टॉवेल ठेवावा. हा पेपर टॉवेल जास्त ओलावा शोषून घेण्यास मदत करतो आणि जास्त काळ कोथिंबीर आणि पुदिना ताजे राहतात. 
 
फ्रीजरमध्ये कसे साठवाल-
कोथिंबीर आणि पुदिना हे चिरून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि वर पाणी घाला. ज्यामुळे त्या बर्फाच्या तुकड्यांमध्ये गोठतात. मग हे बर्फाचे चौकोनी तुकडे एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवावे.
 
कोमेजणारी पाने काढून टाकावी-
जर फ्रीजमध्ये ठेवलेली कोथिंबीर मधील काही पाने कोमेजायला लागली असतील तर ते काढून टाका. फक्त ताजी पाने साठवा जेणेकरून इतर पाने कोमेजणार नाहीत आणि कोथिंबीर आणि पुदिना जास्त काळ ताजे राहतील. तसेच या सोप्या ट्रिक वापरून तुम्ही कोथिंबीर, पुदिना ताजे ठेवू शकता. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पॅकबंद खाद्यपदार्थांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका, रसायने सापडली