Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लसूण सोलण्याचा सर्वात सोपा मार्ग

लसूण सोलण्याचा सर्वात सोपा मार्ग
, मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:42 IST)
लसूण हा एका खाद्य घटक आहे, जे कोणत्याही खाद्य पदार्थाची चव पूर्णपणे बदलतं. फक्त बाजारपेठेतच नव्हे तर घराघरात देखील अन्नाची चव वाढविण्यासाठी लसणाचा वापर करतात. आलं-लसूण पेस्ट भाजीत घातले तर वा ! काय सांगावं ! लसणाची एक वेगळीच तीक्ष्ण चव असते. परंतु लसूण वापरण्यासह एक मोठी समस्या आहे आणि ती आहे लसूण सोलण्याची. 
 
लसूण सोलायला खूपच वेळ लागतो. याच कारणास्तव भाजीमध्ये लसणाची फोडणी करण्यास कंटाळा येतो. कदाचित हे आपल्या बाबतीत देखील घडले असणार. चला तर मग आज आम्ही आपल्याला लसूण सोलण्याचा काही सोप्या पद्धती बद्दल सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण देखील लसणाचा वापर करायला लागणार.
 
पहिली पद्धत -
ही पद्धत फार सोपी आहे आणि अशा पद्धतीने लसूण सोलताना त्याचा रसाने आपले हात देखील चिकट झालेले जाणवणार नाही. या साठी आपण एका वाटीत हलके गरम पाणी घेऊन त्यामध्ये 10 मिनिटे लसूण भिजत ठेवावे. या नंतर आपण लसणाला हाताने चोळून घ्या, आपण बघाल की लसणाचे साल अगदी सोप्या पद्धतीने निघाले आहेत.   
 
दुसरी पद्धत - 
ज्या वेळी आपल्याला जास्त प्रमाणात लसूण सोलायचे असल्यास ही पद्धत वापरा. या मध्ये खूप वेळ द्यावा लागतो. म्हणून कढईला हलकंसं तापवून घ्या. त्या मध्ये लसणाच्या कांड्या घाला. दोन ते तीन मिनिटे भाजून घ्या. थंड झाल्यावर लसणाला सोळा. लसूण चटकन सोलले जाईल. आपल्याला लसूण सोलायला काहीच त्रास होणार नाही.
 
तिसरी पद्धत - 
लसणाला ठेचून देखील त्याला चटकन सोलता येतं. या साठी आपण ओट्यावर किंवा स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर लसणाच्या कांड्या ठेवून लाटण्याच्या साहाय्याने हलकं ठेचा. असे केल्यानं लसणाच्या वरच्या बाजूचे साल निघतील. त्या नंतर आपण हाताने साल काढू शकता.
 
चवथी पद्धत -
लसणाला गरम करून देखील सोप्या पद्धतीने सोलू शकता. या साठी आपण कढईत लसूण गरम करण्या व्यतिरिक्त मायक्रोवेव्हची मदत देखील घेऊ शकता. आपण फक्त 30 सेकंदासाठी लसणाला मायक्रोवेव्ह मध्ये ठेवा आणि नंतर लसूण सोलून घ्या. लसूण चटकन सोलले जाणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना विषाणू 30 सेकंदातच मारता येऊ शकतो, फक्त हे करा