Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kitchen Hacks: अशा प्रकारे Plastic च्या भांड्यांवरील डाग आणि वास दूर करा

How to Clean Plastic Utensils
, मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (17:29 IST)
आजकाल बहुतेक लोक प्लास्टिकची भांडी वापरू लागले आहेत. तसं तर गरम पदार्थ प्लास्टिकच्या भांडीमध्ये ठेवू नये. परंतु कोरड्या वस्तू ठेवण्यासाठी उच्च क्वालिटीचे प्लास्टिकचे भांडे वापरता येतात. पण अनेकदा त्यावर डाग राहिले तर त्याचं लुक बिघडतं. जर तुम्ही कोणत्याही खाद्यपदार्थाला प्लास्टिकच्या भांड्यात ठेवले तर त्यावर डाग राहतो. जर तुम्ही देखील या समस्येने त्रस्त असाल, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या टिप्स फॉलो करून तुम्ही या समस्येपासून कसे मुक्त होऊ शकता जाणून घेऊया ...
 
व्हिनेगर
प्लास्टिकच्या भांड्यातील डाग काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. यासाठी तुम्ही प्लॅस्टिकच्या भांड्यांवर थोडा व्हिनेगर शिंपडा आणि काही काळ सोडा. 10 मिनिटांनंतर तुम्ही भांडे घासून स्वच्छ करा. असे केल्याने, अन्नपदार्थाचा वास आणि डाग दोन्ही भांड्यातून बाहेर येतील आणि तुमचे भांडे पूर्वीसारखे नवीन होतील.
 
बेकिंग सोडा
प्लास्टिकच्या भांडीवरील डाग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा हा देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी भरा आणि त्यात 4 चमचे बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करा. आता या पाण्यात प्लास्टिकची घाण भांडी काही काळ सोडा. यानंतर, 30 मिनिटांनंतर भांडी घासून घासून स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा. असे केल्याने तुमचे भांडे पूर्वीसारखे चमकतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंगेचे पाणी कधी खराब का होत नाही, जाणून घ्या