Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या

ताजे मासे कसे ओळखावे? बाजारातून मासे आणताना ही काळजी घ्या
, मंगळवार, 28 सप्टेंबर 2021 (16:39 IST)
ताजे मासे ओळखणे देखील एक कला आहे आणि मासा विकत घेताना काळजी घेणे आवश्यक आाहे. मासे निवडून कापून आणि काटे काढून आणणे देखील महत्त्वाचं काम असतं. जाणून घ्या मासे कसे निवडावे- 
 
ताजे मासे दिसायला तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. 
मासा कडक आणि ताठ असावा.
मरगळलेले मासे घेऊ नये. 
ताज्या माशांना किंचीत हिरमुस वास असला तरी घाण- कुजकट वास येत नाही.
ताज्या माश्याचे डोळे चकचकीत आणि पारदर्शक दिसतात. लालसर किंवा धुरकट पांढरे डोळे असेलेले मासे घेऊ नये.
ताज्या माशांच्या तुकड्यांवर पारदर्शक पांढऱ्या रंगाची झाक असते.
मोरी, मुशीसारखे मासे समोर कापून घ्यावे.
पापलेटच्या कल्ल्यातून पांढरा द्रव येत असल्यास ते ताजे समजावे.
बोबिल ताजे असताना तोंडाकडे केशरी, गुलाबी असावे.
शिळा मासा बोटाने दाब दिल्यावर खोलगट ठसा उमटतो. असा मासा घेऊ नये.
ताज्या माशाचे कल्ले जरा उघडून पाहिल्यास आतमधून बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील.
खेकडे घेताना काळसर रंगाचे, जिवंत आणि चालणारे घ्यावे. 
खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबावी. जर पाठ कडक असेल तर खेकडे आतुन मांसाने भरलेले असतात. पाठ दबत असल्यास खेकडे आतून पोकळ असतात. 
भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा हे मासे बोटांनी दाबून बघावे. घट्ट असल्यास घ्यावे. 
माशांचे तोंड उघडून बघावे. आतमध्ये लालसर भाग दिसल्यास ते ताजे समजावे. काळसर रंग दिसल्यास ते शिळे किंवा खराब असे समजावे.
पापलेट घेताना डोळ्याखालचा भाग दाबून बघावा. त्यातुन पांढरं पाणी आले तर ते ताजे समाजवे आणि लाल पाणी आल्यास ते शिळे असतात हे समजावे. 
पापलेट खराब होत आल्यास त्यांना पिवळसर रंग येऊ लागतो.
शिंपले घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्या. 
जिवंत आणि तोंडाची उघडझाप करणाऱ्या शिंपल्या घेणे योग्य.
तांबुस पांढर्‍या रंगाची आणि घट्ट सालीची करंदी ताजी असते. 
तोंड उघडून बघितल्यास लालसर रंगाचे दिसणारे बांगडे ताजे असतात. 
शिळ्या बांगड्यांना पिवळसर रंग येऊ लागतो आणि ते मऊ पडतात. त्यांना बोटांनी दाबल्यास खड्डा पडतो.
उघडलेले शिंपले शिळे असतात.
करली घेताना कोळीणीकडून तिरपी कापून घ्यावी त्यात काटे खूप असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मासे खाण्याचे अनेक फायदे, यात सर्व वयोगटातील लोकांसाठी आवश्यक पोषक घटक