Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Clean Pressure Cooker प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी या सोप्या टिप्स अवलंबवा

webdunia
आजकाल प्रेशर कुकर हा स्वयंपाकघराचा एक प्रमुख भाग बनला आहे. स्वयंपाकघरातील या उपकरणामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. तथापि, प्रेशर कुकर काही कालावधीत घाण होतात. त्याच्यावर डाग पडतात. त्यामुळे प्रेशर कुकर घाण  दिसतो. प्रेशर कुकरचे घाणेरडे डाग स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा.  
 
अनेकदा स्वयंपाक करताना कुकर जळतो. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, कुकरमध्ये खोलीच्या समान तापमानाचे पाणी भरा आणि काही मिनिटे मंद आचेवर ठेवा.  त्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचा रस घालू शकता. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा. आता पाणी थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर डिशवॉशिंग लिक्विडने कुकर स्वच्छ करा.
 
मसाल्यांमुळे कुकरच झाकण घाण होतात. कुकरवर मसाल्याचे डाग असतील आणि  दूर करायचे असेल तर तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी कुकरमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून स्पंजच्या मदतीने स्वच्छ करा.
 
 प्रेशर कुकर स्वच्छ करायचा असेल तर कांद्याची साल वापरू शकता. यासाठी कुकरमध्ये काही मिनिटे पाणी ठेवून कांद्याची साल किंवा कांद्याचे तुकडे उकळा. यानंतर स्पंजच्या मदतीने प्रेशर कुकर स्वच्छ करा. कांद्यामध्ये सल्फ्यूरिक ऍसिड असते. त्यामुळे कुकर स्वच्छ होण्यास मदत होते.
 
प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर देखील वापरू शकता. यासाठी  कुकरमध्ये ऍपल सायडर व्हिनेगरचे काही थेंब टाका आणि स्पंजच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे कुकर पूर्वीसारखा स्वच्छ होईल.
 
प्रेशर कुकर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सेंधव मीठ वापरू शकता. यासाठी कुकरमध्ये पाणी भरल्यानंतर त्यात एक चमचा सेंधव मीठ टाकून चांगले उकळावे. यानंतर कुकर स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय केल्याने कुकर पूर्णपणे स्वच्छ होईल. 

Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

International Kissing Day का साजरा केला जातो, जाणून घ्या चुंबन घेण्याचे फायदे