Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Vat Purnima 2025 Ukhane Marathi: वट पौर्णिमेनिमित्त उखाणे

वट पौर्णिमेनिमित्त खास मराठमोळे उखाणे
, मंगळवार, 10 जून 2025 (06:42 IST)
वट सावित्रेला नमन करते, तुझ्या सृष्टी मुळे आनंदी आहे मनुष्य,
..... रावांचे नाव घेते, त्यांना मिळूदे १०० वर्ष आयुष्य. 
 
वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात,
.....रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर आशीर्वादाचे हात.
 
यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे, १० जून,
.....रावांचे नाव घेते, ..... घराण्याची सून.
 
वटवृक्षाची पूजा करून, गरजू व्यक्तीला करावे दान,
.....रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.
 
पाच सुहासिनी स्त्रियांची, ओटी मी भरली,
..... रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली.
 
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,
.....रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा.
 
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे, ५ फळे आणि फुले,
.....रावांचे नाव घेते, देवाच्या आशीर्वादाने झाली मला २ मुले.
 
सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले,
..... सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले.
 
हवी अंधारल्या राती, चंद्र किरणांची साथ,
..... रावांची हवी मला, ७ जन्माची साथ.
 
आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
..... रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.
 
झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास,
..... रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास.
 
सण आहे आज वटपौर्णिमेचा,
..... रावांसोबत असाच, संसार राहूदे सुखाचा.
 
मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण,
..... रावांचे नाव घेते, सुखी राहु देत सर्वजण.
 
देवच बनवतो, ७ जन्माची गाठ,
..... रावांच्या दीर्घआयुष्यासाठी, वडाला फेरे मारते सात.
 
आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊ देत तुमच्या ईच्छा,
..... रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 
वट पौर्णिमेचे व्रत, निष्टेने करते,
..... रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते.
 
आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
..... रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.
 
आज पहिलीच आहे, माझी वटपौर्णिमा,
.....रावांसोबत, एकही क्षण करमेना.
 
वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन,
..... रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.
 
आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवला मी उपवास,
..... रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
 
आज आहे माझी पहिली, वट सावित्री,
..... रावांचे नाव घेते, होऊदेत त्यांची अखंड किर्ती.
 
वडाची पूजा करते, आणि मागणे मागते सुखी राहू दे सृष्टी,
..... रावांचे नाव घेते, देवा नेहमी असुदे आमच्यावर तुझी दृष्टी.
 
सत्यवानाचे प्राण वाचवून, वाढविली सावित्रीने सर्वांची शान,
.....रावांचे नाव घेताना, मला फार वाटतो अभिमान.
 
वटवृक्ष म्हणजे, निसर्गाचा अनमोल ठेवा,
..... रावांची मी, आयुष्यभर करेन सेवा.
 
लग्नानंतर वटपौर्णिमेचा, माझा पहिला आहे सण,
.....रावांचे नाव घेते, ठेवून निर्मळ मन.
 
वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,
..... रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.
 
प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौणिमेची,
..... रावांचे नाव घेते, सून .....ची.
 
थाटात पार पडला, आज वटपौर्णिमेचा सोहळा,
..... रावांचे नाव ऐकण्यास, सर्वजण झाले गोळा.
 
कुंकवाचा साज, असाच कायम राहू द्या,
..... रावांना डोळे भरून, ७ जन्म पाहू द्या.
 
पतीच्या दीर्घयुष्यासाठी, निष्ठेचे बंधन,
.....रावांचे नाव घेऊन करते, सर्वांना वंदन.
 
वटपौर्णिमेला सुहासिनी, पूजतात वड,
..... रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत जड.
 
आमच्या जोडीला, कोणाची नको लागू दे नजर,
......रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर.
 
वटपौर्णिमेला व्रत ठेवायची, आहे प्रथा,
...... रावांसोबत ऐकेन आज, वटसावित्रीची कथा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CBSE या ICSE : सीबीएसई की आयसीएसई शालेय शिक्षणासाठी कोणता बोर्ड चांगला आहे