Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi
, गुरूवार, 9 जानेवारी 2025 (12:53 IST)
मकर संक्रांतीला, काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड,
_राव माझे पती नाहीत, तर आहेत बेस्ट फ्रेंड.
 
लग्नानंतर मकर संक्रातचा पहिला सण करते साजरा,
_ रावांचा स्वभाव, आहे फार लाजरा.
 
गुळाने येते, तिळाला गोडी,
_ रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी.
 
गोड गुळात, मिसळले तीळ,
_ रावांना देऊन बसले मी, पहिल्या भेटीतच दिल.
 
तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा
_ रावांचे प्रेम लाख रुपये तोळा.
 
तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान
_ रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.
 
तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा
_ चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा.
 
आकाशात दिसतोय, पंतंगाचा वेगवेगळा रंग,
_ राव हवेत मला, ७ जन्मासाठी संग.
 
तिळगुळाचा स्वाद, आणि आनंदाची लहर,
_ रावांमुळे आली आयुष्यात, सुखाची बहर.
 
नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या, पूर्ण होवोत ईच्छा,
_ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
मकर संक्रांतीचा आज आहे, शुभ पर्व,
_ रावांचे नाव घेताना, मला वाटतो गर्व.
 
तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी,
_ रावांचे नाव घेते, सुखी असावी आमची जोडी.
 
सूर्याची राशी बदलेल, तुमचे भविष्य,
_ रावांमुळे, बदलेल माझे आयुष्य.
 
हलव्याचे दागिने, त्यावर काळी साडी,
नेहमी खुश राहो _ रावांसोबत आमची जोडी.
 
नाही मोठे पणाची अपेक्षा, नाही दौलताची इच्छा,
_ रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,
_ रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.
 
आई वडिलांसारखी माया, नसते कोणाला,
_ रावांचे नाव घेते, संक्रांतीच्या सणाला.
 
तिळगुळ आणि लाडूने करूया, तोंड गोड,
_ रावांना अशीच असुदे, दोन्ही परिवाराची ओढ.
 
रामायण महाभारतात, बघितले असतील सर्वांनी बाण,
_ रावांचे नाव घेते, घ्या संक्रांतीचा वाण.
 
हलव्याच्या दागिन्यांची माळ, आणि सोन्याचा साज,
_ रावांचे नाव घेते, मकरसंक्रात आहे आज.
 
मकर संक्रांति म्हणून, ठेवला आहे मी उपवास,
_ रावांचे नाव घेते, आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास.
 
भावनात जन्मली कल्पना, फुल गुंफिले शब्दांचे,
_ रावांच नाव घेते, मन राखून सर्वांचे.
 
नवीन वर्षाची सुरवात झाली, संक्रांतीपासून,
_ रावांसोबत सर्व सण साजरे करेन, आजपासून.
 
आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा,
_ रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.
 
आज मकर संक्रांत म्ह्णून, मी आले नटून,
आणि _ रावांसोबत मी अशी 
आमची जोडी दिसते, सर्वात उठून.
 
संक्रांतीच्या सणाला आहे, सुगड्यांचा मान,
_ रावांच्या नावावर देते, हळदी कुंकूच वाण.
 
आज मकरसंक्रांत म्हणुन, दाराला लावले तोरण,
_ रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण.
 
तिळगुळ दिल्या घेल्याने जातो, नात्यातला कडूपणा,
_ रावांची सौभाग्यवती म्हणून, मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा.
 
माहेरच्या मायेला, नाही कशाची सर,
_ रावांच्या सहवासात, न वाटे कसली कसर.
 
आज मकरसंक्रांत म्ह्णून, जेवण केले आहे गोड,
_ रावांची आहे, मला फार ओढ.
 
देवापुढे ठेवण्यासाठी आणले, नारळ आणि केळी,
_ रावांचे नाव घेते, मकरसंक्रातीच्या वेळी.
 
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
_ रावांचे नाव घेते, सर्वांनी कान आणि डोळे खोला.
 
हळद लावते कुंकू लावते, वाण घेते घोळात,
_ रावांचे नाव घेते, सवासनीच्या मेळ्यात.
 
संक्रातीच्या दिवशी, तिळाचे काढते सत्व,
_ रावांचे नाव घेते, आज हळदी कुंकवाचे महत्व.
 
लग्नानंतर आज आहे, आमची पहिली संक्रांत,
_ रावांचे नाव घेते, सुख समृद्धी येउदे आमच्या संसारात.
 
मकर संक्रांतीला असतो, हलव्याच्या दागिन्यांना मान,
_ रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण.
 
हिऱ्याची अंगठी, चांदीचे पैंजण
_ रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण
 
पुराणपोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ,
_ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.
 
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
_ रावांचे नाव घेण्याचे, सौभाग्य मला.
 
तिळाची माया, गुळाची जोडी,
परमेश्वर सुखी ठेवो माझी _ रावांसोबतची जोडी.
 
मराठ मोळे सण, आहेत किती छान,
_ रावांची पत्नी असण्याचा, मला आहे अभिमान.
 
गुळाने येतो, लाडूला गोडवा,
_रावांचे नाव घेते, आज सर्वांना संक्रातीला बोलवा.
 
मकर संक्रांत हा, पोंगल म्हणून देखील केला जातो साजरा,
__ रावांचा मला आवडतो, चेहरा लाजरा.
 
तिळाचा लाडू, खायला येते मज्जा,
_ रावांनी केला, माझ्या मनावर कब्जा.
 
संक्रातीच्या दिवशी, महिला जमल्या हळदी कुंकवाला,
_ रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला.
 
मकर संक्रांतीला, कपडे घालतात काळे,
_ रावांना नेमही सुचतात, कुठेपण चाळे.
 
मोठ्यांचा करावा आदर, मान सन्मान,
_ रावांच्या नावाने घेते, सौभाग्याचे वाण.
 
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, प्रेमाचा असावा साठा,
_ रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
 
एका आठवड्यात, दिवस असतात सात,
_ रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत.
 
आजच्या दिवशी, घरी जमल्या साऱ्या मावशी,
_ रावांचं नाव घेते, मकरसंक्रांतीच्या दिवशी.
 
काकवी पासून, बनवतात गुळ,
_ रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.
 
संसारुपी सागरात पली असावे हौशी
_ रावांचे नाव घेते मकर संक्रांती दिवशी.
 
मकर संक्रांतीला तीळगूळ वाटणे, आणि पतंग उडवण्याची आहे प्रथा,
_ रावांसोबत पूजेला बसून, वाचते मी सत्यनारायणाची कथा.
 
मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून, धुवू सारे दुःख,
_ रावांच्या जीवनात, नेहमी असुदे सुख.
 
ते उडवत होते पतंग, आणि मी पकडली होती फिरकी,
_ रावांच्या मागे, सात जन्म अशीच घेईन मी गिरकी.
 
मकर संक्रांतीला, काळ्या कापडाला फार आहे डिमांड,
_ राव माझे सर्व हट्ट पूर्ण करा, नाहीतर सर्वांसमोर घेते रिमांड.
 
हलव्याचे दागिने, काळ्या कपड्यावर दिसतात उठून,
सर्वजण विचारतात __ हॅंडसम, भेटले कुठून.
 
मकर संक्रांत म्हणून, पतंगाने आकाशात घेतली भरारी,
मी घेतली _ रावांसोबत, आयुष्यभराची सवारी.
 
लाडू बनवण्यासाठी, गुळात मिसळले तिळ,
_ रावांना देऊन बसले मी, पहिल्या भेटीतच दिल.
 
गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,
_ रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.
 
आली आली संक्रांत, घ्या सौभाग्याच वाण,
_ राव आहेत प्रेमळ, जशी आनंदाची खाण.
 
लज्जेचे बंधन असले तरी, नाव आहे ओठी,
_ रावांचे नाव घेते, तुमच्या आग्रहापोटी.
 
तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,
_ रावांचे नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक