Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओढ-अंतरीची

- सौ. स्वाती दांडेकर

ओढ-अंतरीची
ND
क्षण भरांच्या मिलनाची
वाट पाहते युगांन पासूनी
कशी ही ओढ अंतरीची
साद तुझी ऐकण्या साठी
अधीर आहे किती मी
दिवस सरला, रात्र गेली
घटका, पळ, सरता-सरता
अनेक वर्ष पण निघुन गेली
साद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची ।।1।।

webdunia
ND
एक क्षण तुला पाहण्या साठी
किती वाट पाहते मी
प्रतिक्षे मधे अधीर होतात डोळे
वाहते अश्रु धारा समवेत
अंतर मधले तेच रा‍हीले
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची ।।2।।

webdunia
ND
माझ्या मनीची ओढ तुजला
आणेल जरूर माझ्या पाशी
किती ही दूर असला तरी
सदैव राहील माझ्या हृदयाशी
येईल जरूर क्षण भाग्याचा
संपेल रात्र युगांतरीची
जाणवेल तुजला ओढ अंतरीची ।।3।।

Share this Story:

Follow Webdunia marathi