प्रिये, तू येते - तो वसंत
प्रिये, तू जाते - तो ग्रिष्म ।।
तू येताच - मन फुलतय्
कळी खुलून - फुल उमलतय् ।।
तू येताच - उसळते काहीतरी
माझ्या बोलण्यात - तू मौन राही ।।
तुझ्या येण्याने - उरात धडकी
माझ्या जाण्याने - होतेस रडकी ।।
तुझ येणं - रोमांचकारी असते
तुझ्या जाण्याने - कोरडेपण येते ।।
तु्या येण्याने - आधार वाटतो
तुझ्या जाण्याने - निराधार होतो ।।