प्रत्येक मुलगी कधी न कधी कल्पनातीत होते,
आपल्यास ती कुठंतरी राजकन्येत बघते,
प्रत्यक्षात ती कशी का असेना, फरक पडत नाही,
त्यानं तिची किंमत जराही कमी होत नाही,
तिचं ही मन गुंतत घेरदार सुंदर कपड्यात,
डोक्यावर असावा मुकुट,मिरवाव खूप थाटात,
यावा "तो"राजकुमार घोड्यावर बसुन ,
न्यावं तिला दूर देशी घोड्यावर बसवून,
दाखवावी रम्य "ती"दुनिया ज्यात जावं हरवून,
नुसत्या कल्पनेनं च ती बिचारी जाते सुखावून,
सत्यता जी असेल ती असेल,पण हे सत्य आहे,
प्रत्येक मुलीचा "राजकुमार"तिची वाट बघतो आहे.