Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

हल्लीचे लग्न अन तरुण पिढी

Recent marriage
, गुरूवार, 9 एप्रिल 2020 (13:36 IST)
लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या पोटात गोळा हा येतोच.पण ते जेवढं आनंदाच तेवढच नंतर त्रास दायकही अन मजेशीर गोष्ट पण असते. हुशारीने समजूतदार पणाने निभावलं तर आनंद नाही तर ....असो पण ह्या सार्या आनंददायी गोष्टीत काही गोष्टी अशाही असतात ज्या हल्ली जास्त वाढत जात आहेत. मुलीच्या वडीलांना वाटत मुलगी सुखी असावी तर मुलाच्या बाजूनही अशाच गोष्टी असतात सुन स्वभावाने चांगली असावी समजूतदार असावी. पण असो सारं काही मिळणं कुणाच्याही नशीबात नसत. किंवा ते मिळालंही तरी नंतर कुठे ना कुठे कमी ही असतेच कारण प्रत्येक माणूस हा कधीच परीपुर्ण नसतो.लेखातही अशाच काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतोय पण यासार्या गोष्टी तुम्ही अनुभवी लोक समजून घ्याल काही चूकीच लिहीलं गेल्यास माफ कराल.

लग्न म्हणजे दोन जीवांच मिलन .त्या दोघांतील अटूट प्रेम, त्याग अन दोघांतील समजूतदार पणा पण हल्ली ह्या गोष्टी राहील्याच कुठे आहेत. लग्न म्हणजे एक व्यवहार अन तो दोघांमध्ये झालेला तो करार हा करार बर्याच अटींनी युक्त असतो. तो मोडला की लग्न मोडलं. तो जोपर्यंत पालन करु तोपर्यंत ठिक नंतर घटस्फोट. पण कुणी हे लक्षात घेत नाही की हे बंधन इश्वराने बांधून दिलय अन त्याच्याच सहमतीने झालय.पण नाही ह्या गोष्टी कुणाच्याच लक्षात येत नाहीत. अन परीणाम खुपच वाईट होतात. असो हल्ली घटस्फोटाचं प्रमाण ह्याच कारणांमुळे वाढलय. त्यात अजून काही कारण ही आहेत. जी शारिरीक अन मानसिक असतात. बेडरुममधील भांडणही बर्याच वेळेला कारणीभूत  असतात. स्त्री वर्ग आज बर्या जून्या प्रथांना बळी पडल्या आहेत त्यात कौमार्य चाचणी पण आहे.
 
webdunia

हल्लीची तरुण पिढीपण सध्या लग्न संस्कारापासून अलिप्त आहे. अन लव  लिव इन वगैरे सारख्या क्षणीक सुखात बुडालीय. पण यांना अजून ही कल्पना नाही की लग्न हाही एक संस्कार असतो. अन साताजन्माच्या गाठी असतात पण हे ह्या तरुण पिढीला कधी कळेल कधी सुधरतील. शारिरीक आकर्षणाने ही तरुण पिढी गुलाबी झालीय अन ह्यातच आनंद मानणारी आहे. पुणे मुंबइत न बघवणारी दृष्य समोर दिसतात. पण कुणी बोलण्याच साध धाडसही करत नाही. रुम वर राहणारी ही मुलं मुली नको ते चाळे करुन पार हिंदू संस्कृतीवर अत्याचार करत आहेत कधी सुधरतील कुणाच ठाऊक. लग्न हाही एक संस्कार असतो हे कोण सांगेल ह्या तरुण पिढीला.

असो देव नक्की सदबुध्दीदेईल अन सुधरतील. लग्न संस्कार टिकून राहतील कारण हेही एक सत्य आहे.
- वीरेंद्र सोनवणे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुवयांच्या खाली दुखत असेल तर....