Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शॉवरमध्ये शारीरिक संबंध ठेवताना लक्षात ठेवण्याच्या ५ महत्त्वाच्या गोष्टी

shower bath tub bath
, सोमवार, 10 नोव्हेंबर 2025 (13:25 IST)
शारीरिक संबंधाचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी, नवीनता आणि उत्साह टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच तुम्ही त्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकाल. संबंध अधिक  आनंददायी बनवण्यासाठी तुम्ही कदाचित नवीन पोझिशन्स वापरून पाहिल्या असतील, पण नवीन ठिकाणी, विशेषतः आंघोळ करताना, ते वापरून पाहण्याबद्दल काय? शॉवर मध्ये हा मजा घेऊन तुम्ही तुमच्या जोडीदाराला कसे संतुष्ट करू शकता. कारण हे पण नॉर्मल पोझिशनप्रमाणे लॉग लास्टिंग असतं, ज्यात पाण्यात पार्टनरसोबत संबंधाचा मजा घेतला जातो. हे रोमांचक असलं तरी यात कोणत्याही अपघातांना रोखण्यासाठी काळजी घेणे देखील आवश्यक आहे. या दरम्यान लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी पाहूया.
 
पाण्याचे तापमान
पाण्याचे तापमान तुमच्या दोघांनाही आरामदायक वाटेल इतकेच ठेवा. खूप गरम पाणी त्वचेला आणि गुप्तांगांना त्रास देऊ शकते. पाण्याचा जेट थेट संवेदनशील भागांवर पडू नये याची काळजी घ्या, कारण त्याचा वेदनादायक किंवा त्रासदायक अनुभव येऊ शकतो.
चिकटपणा आणि वंगण
पाण्यामुळे नैसर्गिक वंगण कमी होते, ज्यामुळे त्रास होऊ शकतो. शॉवरमधील पाण्यामुळे नैसर्गिक वंगण लगेच धुऊन जाते. त्यामुळे वॉटर-बेस्ड ल्युब वापरा किंवा सिलिकॉन-बेस्ड  ल्युबचा वापर करा. तेल-आधारित ल्युबमुळे शॉवरचा फ्लोअर अधिक निसरडा होऊ शकतो, म्हणून ते टाळलेले चांगले.
 
नॉन-स्लिप मॅट टाका
शॉवरमध्ये सर्वाधिक धोका घसरून पडण्याचा असतो, त्यामुळे सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. शॉवरच्या फ्लोअरवर रबरची नॉन-स्लिप मॅट नक्की वापरा. शॉवरमध्ये भिंतीला लावलेले मजबूत हँडल्स किंवा रेलिंग्ज असल्यास, त्यांचा आधार घ्या. एका पायावर किंवा कठीण स्थितीत उभे राहणे टाळा. शक्य असल्यास, कठीण 'स्टँडिंग' पोझिशन्स टाळा. भिंतीला टेकून किंवा बसून सेक्स करणे अधिक सुरक्षित असू शकते.
योग्य पोझिशन्स
शॉवरमध्ये जास्त जागा नसल्याने आणि घसरण्याचा धोका असल्याने, साध्या आणि आधार देणाऱ्या पोझिशन्स निवडा. दोघांपैकी एकाने भिंतीकडे तोंड करून उभे राहावे आणि दुसऱ्याने त्याला मागून आधार द्यावा. शक्य असल्यास बाथटबमध्ये बसून किंवा गुडघ्यावर झुकून अधिक आरामदायी आणि सुरक्षित पोझिशन्स वापरण्याचा विचार करा.
 
प्रोटेक्शन विसरु नका
आपण शॉवरचा मजा घेत असला तरी प्रोटेक्शन विसरता कामा नये. संक्रमित संसर्ग टाळण्यासाठी या काळात नेहमीच संरक्षण वापरा. शॉवर मध्ये शारीरिक संबंध ठेवणे हा एक वेगळा आणि रोमांचक अनुभव असू शकतो, पण सुरक्षितता आणि आराम याला नेहमीच प्राधान्य द्या.
अस्वीकारण: हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ! फॅटी लिव्हरचा धोका १०० पटीने वाढेल; तज्ज्ञांचा इशारा