Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे प्रेम नव्हे... आजार आहे

हे प्रेम नव्हे... आजार आहे
प्रेमात जुनून असणे वाईट नाही परंतू प्रेमामुळे दुसर्‍याला मानसिक संताप देणे प्रेम नव्हे विकृतपणा आहे.
 
कोणाचा पिच्छा करणे, ब्लॅकमेल करणे, वारंवार मेसेज करणे, फोन करून परेशान करणे, याला 'स्टॉकिंग' म्हणतात. हा गुन्हा असला तरी एका प्रकाराचा आजार आहे हे विसरून चालणार नाही. 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' या आजारामुळे अनेक लोकांना मानसिक कष्ट सहन करावा लागतो.
 
काय आहे ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर?
ही एका प्रकाराची मानसिक स्थिती आहे ज्यात लोकं एखाद्यावर असामान्यपणे आकर्षित होतात. त्यावर केवळ आपला हक्क असून प्रेमाची आस ठेवतात. समोरचा दुर्लक्ष करत असेल तर ते सहन होत नाही आणि कोणत्याही प्रकारे समोरच्या आपलंसं करण्याच्या प्रयत्नात असामान्य कृत्य करतात.
 
आजाराचे लक्षण
कोणाप्रती अतिशय आकर्षण
त्याबद्दल सतत येणारे विचार
समोरच्या हक्क समजणे 
समोरच्याकडून प्रेमाची अपेक्षा करणे
त्यांच्याकडून नकार सहन न होणे
समोरच्यावर स्वामित्व दर्शवणे 
सतत त्यांच्याबद्दल बोलणे
सतत त्यांच्या विषय काढणे
समोरच्यामुळे इतर नाती विसरणे
समोरच्याला सतत फोन करणे, मेसेज करणे आणि वैयक्तिकरीत्या किंवा सोशल मीडियावर स्टॉक करणे
ब्लॅकमेल करणे कश्या प्रकारेही स्वत:बद्दल प्रेम निर्माण करवण्याचा प्रयत्न करणे खरंतर हे लक्षण प्रेमात पडल्यावर देखील दिसतात परंतू असामान्य रूपात असे लक्षण दिसणे म्हणजे 'ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर' आजार असल्याचे नाकारता येणार नाही.
 
हा आजार होण्यामागे अनेक कारण असू शकतात. मानसिक आरोग्याशी जुळलेल्या या आजारात लोकांना स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवणे कठिण जातं. 
 
अनेकदा लहानपणी कुटुंबातील वातावरण किंवा नात्यांचे कडवे अनुभव जबाबदार असतात. त्यामुळे असे लोकं कित्येकदा लोकांपासून अती अंतर निर्माण करू घेतात तर कधी समोरच्यावर आवश्यकतेपेक्षा अधिक अवलंबून जातात. तसेच असुरक्षेची भावना देखील जबाबदार ठरते. ज्यात लोकं स्वत:च्या भावना समजू पात नाही आणि नातं टिकेल की नाही याची भीती आणि असुरक्षेची भावना घर करून जाते. किंवा हा आजार होण्यामागे भ्रम देखील कारणीभूत ठरू शकतो. समोरच्या आपल्या प्रेमात आहे असा गैरसमज होतं.
 
काय करावे
जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर अती प्रभाव पडत असून आपण त्याला विसरू शकत नाहीये किंवा यामुळे आपल्या दिनचर्यावर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रभाव जाणवत असेल तर मदत घ्यावी. या साठी आपण आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा ज्यावर आपल्याला विश्वास असेल अशा एखादा व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. त्यांचा सल्ला किंवा साथ आपल्याला बाहेर पडण्यात मदत करेल. 
 
अशात आपलं मन इतर कामात रमवावे. दुसर्‍या लोकांसोबत वेळ घालवावा. आणि एवढे करून देखील आपलं मन पुन्हा तिकडे वळत असेल तर आपल्याला मानसशास्त्रज्ञाची गरज आहे समजावे. काउंसलिंग आणि थेरेपी द्वारे यातून निघता येतं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेसिपी : थुली (सांजा)ची बर्फी तोंडात गोडवा आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम