आतार्पत अनेक कवींनी, गीतकारांनी पहिल्या प्रेमाबद्दलची महती आपल्या काव्याद्वारे व्यक्त केली आहे. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काळ थांबलसारखा का वाटतो? कशाचे म्हणजे अगदी कशाचेच भान राहात नाही. यावर संशोधन करण्यात आले आहे आणि त्यातून ओल्या निष्कर्षानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्या नजरेतील प्रेम होते तेव्हा खरंच काळ थांबलेला असतो. नूझीलंड येथील कॅटनबरी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एखाद्या व्यक्तीला पाहून देहभान विसरण्याच्या मानवी प्रवृत्तीत काळानुसार काही बदल झाला आहे का? यावर संशोधन करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना आश्चर्यकारक निष्कर्ष आढळले.
मानसतज्ज्ञ डॉ. जोना अरॅनटेस यांनी एखाद्या सुंदर पुरुषाला किंवा स्त्रीला पाहून ‘दिमाग की घंटी बज गयी’ असे हिंदी चित्रपटातील सिचुएशन तयार का होते यावर संशोधन केले. पहिल्या नजरेतील प्रेमात काळ थांबतो या आजवरच्या धारणेतून आम्हाला आमच्या संशोधनास मूळ प्रेरणा मिळाल्याचे डॉ. जोना यांनी सांगितले. हॉलीवूडचा टीम बर्टन यांचा गाजलेला चित्रपट बिग फिश आणि टेलर स्विफ्ट यांचे प्रसिध्द गीत ‘टाईम स्लो डाऊन व्हेनेएव्ह यू आर अराऊंड’ यासारखी गाणीसुध्दा याच जागतिक धारणेवरच आधारित असल्याचे त्यांनी म्हटले. संगणकावर सुंदर आणि साधारण दिसणार्या पुरुषांची छायाचित्रे तरुणींना दाखविली. त्यावेळी सुंदर पुरुषांना पाहताना तरुणी संगणकाच्या माऊसवर अधिक वेळ रेंगाळल्याचे पुढे आले. एकप्रकारे त्यांच्यासाठी काळ थांबल्याचे हे द्योतक होते, असे अरॅनटेस यांनी सांगितले.