हे नवीन वर्ष खास बनवण्यासाठी आपल्या प्रियजनांसह नवीन वर्ष साजरे करणे आवश्यक आहे. जर आपण रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. या निमित्ताने त्यांच्यासाठी काहीतरी खास करा म्हणजे नवीन वर्षासह आपल्या नात्यातही नवीनता येईल. अशा परिस्थितीत आपण जोडीदाराला नवीन वर्षात काही भेटवस्तू देऊ शकता. भेटवस्तू देणं ही काही मोठी गोष्ट नाही, पण त्यांना आवडेल असं गिफ्ट द्या.जे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल.
बॉयफ्रेंड किंवा पतीसाठी गिफ्ट- आपल्याला आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडला गिफ्ट द्यायचे असेल तर गिफ्टमध्ये असे काहीतरी द्या, जे त्यांच्याही उपयोगाचे असेल आणि सतत त्यांच्यासोबत असेल. जेणेकरून जेव्हा जेव्हा ते आपण दिलेली भेट पाहतील तेव्हा - तेव्हा त्यांना आपली आठवण येईल. या काही भेटवस्तू आपण पती किंवा प्रियकराला देऊ शकता
1 वॉलेट -जवळजवळ प्रत्येक मुलगा वॉलेट वापरतो. आपण आपल्या जोडीदाराला किंवा प्रियकराला वॉलेट गिफ्ट करा. वॉलेट ही जरी सामान्य भेट असली तरी आपण ती खास बनवू शकता. वॉलेटमध्ये आपण दोघांची एक चांगली फोटो किंवा नोटा ठेवून देऊ शकता. गुडलक साठी वॉलेट मध्ये नाणे किंवा नोट ठेवून द्या.
2 घड्याळ - बहुतेक मुलांना घड्याळ आवडते. घड्याळ त्यांच्या लुकला स्टाईल देते आणि गरजही पूर्ण करते. आपण त्यांना घड्याळ भेट देऊ शकता. आपण एक कपल घड्याळ खरेदी करा, जेणेकरून दोघेही अनेक प्रसंगी एकमेकांबद्दलचे प्रेम दाखवू शकाल.
3 की चेन- मुलांना की चेनची गरज असते. त्यांना बाइक, कार किंवा इतर महत्त्वाच्या चाव्या ठेवण्यासाठी की चेनची आवश्यकता असते. मुलं सुद्धा हे जवळ ठेवतात. आपण पार्टनरला गिफ्ट म्हणून की चेन देऊ शकता.
4 आउटिंग- नेहमीच असं होतं की मुलंच अनेकदा डेटवर घेऊन जातात . या नवीन वर्षात आपण आपल्या पतीला किंवा प्रियकराला डेट वर नेऊन त्यांना सरप्राईज देऊ शकता. या भेटवस्तूने त्यांना आश्चर्यच होईल. या साठी आपण सहलीची योजना आखू शकता. त्यांना त्यांच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जा. त्यांच्यासाठी तो क्षण एखाद्या मौल्यवान भेटीपेक्षा कमी नसणार.
प्रेयसी किंवा पत्नीसाठी भेटवस्तू - जर आपण पत्नीला किंवा मैत्रिणीला नवीन वर्षात भेटवस्तू देत असाल तर आपण त्यांना त्यांच्या आवडीच्या किंवा त्यांच्या वापरण्याच्या वस्तू भेट देऊ शकता. महिलांना भेटवस्तू देण्यासाठी आपल्या कडे अनेक पर्याय आहेत. आपण त्यांना घड्याळ, बॅग किंवा पर्स भेट देऊ शकता. याशिवाय लॉकेट आणि चेनचे डिझाईन देउ शकता. त्यांना दागिने किंवा अॅक्सेसरीजमध्ये विविध वस्तू देखील दिल्या जाऊ शकतात. कानातल्यापासून ते बोटांच्या अंगठ्यापर्यंत भेटवस्तू देऊ शकता. सौंदर्य उत्पादने देखील देऊ शकतात.