प्रेम ही जगातील सर्वात सुंदर फीलिंग असते. कोणाच्या प्रेमता पडल्यावर पूर्ण जग बदलून जातं परंतु हेच प्रेम चुकीच्या व्यक्तीसोबत झाल्यास आविष्य बर्बाद होतं. अनेकदा लोक अशा पार्टनरसोबत रिलेशनमध्ये येतात जी आवश्यकतेपेक्षा आधिक पझेसिव्ह असतात. आणि बस याच कारणामुळे जीवनात समस्या सुरु होतात. हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे की आपला पार्टनर देखील पझेसिव्ह पार्टनर आहे का? कारण असं असल्यास आपल्याला लवकरात लवकर या नात्यातून बाहेर पडणे गरजेचं आहे.
सतत मॅसेज-कॉल करत असतात पझेसिव्ह पार्टनर-
पझेसिव्ह पार्टनरची सर्वात मोठी ओळख म्हणजे ते आपल्या पार्टनरला कोणत्याही परिस्थितीत सोडायला तयार नसतात. ते कोणत्या न कोणत्या बहाण्याने आपल्याला मॅसेज किंवा कॉल करत राहतील जसे आपण कुठे आहात, काय करत आहात, कोणासोबत आहात इ. जर आपला पार्टनर देखील असं करत असेल तर विचार करा.
कंट्रोलिंग असतात पझेसिव्ह पार्टनर-
एक पझेसिव्ह पार्टनरची खास ओळख म्हणजे ते अती कंट्रोलिंग असतात. अर्थात तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या गोष्टी ऐकाव्या लागतील. ते जसं म्हणतील तसं वागावं लागेल, जिथं म्हणतीतल तेथं जावं लागेल.
नातं बिघडवते पझेसिव्हनेस-
जर आपण एखाद्या पझेसिव्ह पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये आहात तर ही गोष्ट लक्षात ठेवा की अशा जोडीदारासोबत राहिल्याने तुमचे आयुष्य पूर्णपणे बिघडते. पार्टनरला फक्त तुमच्यावर हक्क गाजवायचा असतो आणि जर ते हे करू शकले नाहीत तर भांडणे सुरू होतात आणि हळूहळू तुमचे नाते खराब होऊ लागते.