Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माणसाला चुंबन घ्यावसं वाटतं कारण...

माणसाला चुंबन घ्यावसं वाटतं कारण...
, गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (14:55 IST)
- विल्यम पार्क
 
जगभराचा विचार करता ओठांनी ओठावर केलं जाणारं किसिंग (लिप टू लिप किस) ही पद्धत आपल्याला वाटते तेवढी सगळीकडं रूढ नाही. पण मग मानवाच्या किसिंगच्या विविध प्रकारांवरून या क्रियेत एवढं महत्त्वाचं असं काय आहे, याचा शोध घेता येऊ शकतो का?
 
जगभरातील एकूण संस्कृती किंवा समाजांचा विचार करता त्यापैकी जवळपास अर्ध्या भागात लिप टू लिप किस केलं जातं. जगभरातील 168 संस्कृतींच्या अभ्यासावरून हे तथ्य समोर आलं आहे.
 
लास वेगासमधील नेवाडा विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक विल्यम जानकोविक यांनीही याबाबत अभ्यास केला आहे. त्यानुसार केवळ 46 टक्के लिप टू लिप किस या रोमँटिक म्हणजे युगुलानं प्रेमाच्या भावनेनं केलेल्या असतात.
 
उर्वरित लिप टू लिप किसमध्ये एकमेकांची भेट घेताना किंवा आई वडिलांनी मुलांना केलेल्या किसचा समावेश होतो. आपल्याला अगदी लहान बाळ असताना किंवा जन्मजात ओठांनी स्पर्श करण्याची आवड आणि सवय असते. यावरून मानवाला किस करण्याची गरज का भासते? या संदर्भातील दोन सिद्धांत समोर आले आहेत.
 
त्यापैकी पहिली बाब म्हणजे, ओठांच्या मदतीनं आपण बालपणापासून आईचं दूध पित असतो. प्रत्येकाला अगदी जन्मजात त्याची सवय असते. तसंच "प्रिमॅस्टिकेशन फूड ट्रान्सफर" या एका जुन्या पद्धतीमुळंही आई आणि बाळामध्ये लिप टू लिप किसची सवय रूढ झाली असावी असं म्हटलं गेलं आहे.
 
या पद्धतीनुसार प्राचीन काळात आई ही बाळं अगदी लहान असताना त्यांना अन्न भरवण्यासाठी स्वत: तोंडानं चघळून तोंडानंच अन्न बाळांच्या तोंडात भरवत असाव्यात अशी शक्यता आहे. कारण आपले पूर्वज अशी ओळख असलेल्या चिंपांझी आणि माकडांच्या इतर प्रजातींमध्ये तसं आढळून आलं आहे.
 
माणसं किस का करतात?
"मला असं वाटतं की, वैश्विक विचार करता किसिंगबाबत महत्त्वाची बाब किंवा किसिंग न करणं यामागं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे, मानवाच्या उत्तेजनेसाठी (कामुकता शमवण्यासाठी) केवळ किसिंग करण्याऐवजी इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत," असं जानकोविक म्हणाले.
 
ज्या संस्कृतींमध्ये लिप टू लिप किस केलं जात नाही, त्याठिकाणी इंटिमेट होण्यासाठी इतर मार्ग शोधले जातात, असं लेखक शेरील कर्शनबाम म्हणाले. ''डार्विननं मलाय किसबाबत वर्णन केलं आहे. त्यात या समुदायातील महिला जमिनीवर खाली बसलेल्या असतात आणि पुरुष त्यांच्या समोर लटकल्यासारखे असतात. ते दोघं लगेचच एकमेकांचा (आपल्या पार्टरनला) सुगंध घेत असतात."
 
पपुआ न्यू गुनेआच्या पूर्वेच्या किनाऱ्याला असलेल्या ट्रोब्रायंड आयलंड याठिकाणी प्रेमी युगुल एकमेकांच्या समोरासमोर बसून किस करतात.
 
"माझ्या मते आजच्या काळात आपल्यापैकी अनेकांना प्रेम करण्याची (रोमान्स) ही योग्य पद्धत आहे असंही, वाटणारी नाही. पण त्यांच्यासाठी ही पद्धत कामी येते", असं कर्शनबाम म्हणाल्या. लिप टू लिप किस असो किंवा इतर प्रकारचे किसिंग असो, या सर्वात महत्त्वाचं एकमेकांबाबत निर्माण झालेल्या उत्तेजक भावनांची आपसांत देवाण घेवाण होणं हे आहे.
 
ओठ एकमेकांवर दाबून किस करणं हे अनोखं मानवी वर्तन आहे. पण किसिंगमध्ये विकास किंवा उत्क्रांतीसारखा मुद्दा असेल तर, आपल्याला प्राणी किसिंग करताना का आढळत नाहीत?
 
मेलिसा होगनबूम यांनी 2015 मध्ये बीबीसी अर्थला या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. अशाप्रकारे पार्टनरच्या अगदी चेहऱ्याच्या जवळ जाण्यामागचं एक कारण त्यांना व्यवस्थित गंध यावा हे असू शकतं.
 
कारण अशा प्रकारे गंधामुळं अनेकप्रकारची माहिती पार्टनरला मिळू शकते. त्यात पार्टनरनं काय खाल्लं, त्याला आजार असल्यास त्यासंबंधी, त्याच्या मूडबाबत अशी विविध माहिती मिळू शकते. पण मानवाच्या तुलनेत अनेक प्राण्यांमध्ये गंध क्षमता ही खूप चांगली असते. त्यामुळं त्यांना यासाठी एवढं जवळ येण्याची गरज भासत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

"मला काही फरक पडत नाही"