Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत ब्रेकअप होते?

तुमचेही तुमच्या पार्टनरसोबत सतत ब्रेकअप होते?
, गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (13:06 IST)
तुमचे तुमच्या रोमँटिक पार्टनरसोबत सतत ब्रेक अप होत असेल आणि लगेचच तुम्ही एकत्र येत असाल तर तुम्हाला सावधान होण्याची गरज आहे. कारण याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
 
अभ्यासादरम्यान असे दिसून आले, की नात्यामध्ये सतत दुरावा निर्माण होत जातो आणि शेवटी ब्रेक अप होत असते. मात्र, काही जोडपी ब्रेकअप झाल्यावरही पुन्हा जवळ येतात. यामुळे उदासीनता आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांचा त्रास होण्याची शक्यता बळावत असते. नात्याचा दुरुपयोग करणे, अतिशय कमी दर्जाचा संवाद आणि एकेकांमध्ये बांधिलकी नसणे यामुळे नात्यामधील गोडवा कमी होत जातो. अशाच नात्यामधून मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. ब्रेकअप करून पुन्हा एकत्र येणे हे प्रत्येकच जोडप्यासाठी धोक्याची घंटा असतेच असे नाही. खरे तर काही जोडप्यांना ब्रेकअपमुळे त्यांच्या नात्याचे महत्त्व कळत असते. यामुळे ते आपले नाते अधिक घट्ट बनवण्याचा प्रयत्न करतात तसेच त्यांच्याधील बांधिलकी वाढत जाते, असे अेरिकेतील मिसोरी विापीठाच्या साहाय्यक प्राध्यापिका केल माँक यांनी सांगितले.
 
प्रेमाच्या नात्यात अडकलेल्या 500 प्रेमी युगलांवर संशोधन करण्यात आले. ब्रेकअप झाल्यानंतर जोडपी गरजेनुसार एकत्र येतात की व्यावहारिकपणे एकत्र येतात, या दोन बाबींना अनुसरून अभ्यास करण्यात आला.
 
संशोधनानुसार, कोणी फक्त आर्थिक गरजांसाठी नातेसंबंध जपत असतात तर कुणी जीवनाचा एक भाग म्हणून आपले नाते अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, प्रेमामध्ये कुठलेही बंधन न ठेवता सर्पणाच्या भावनेने एकत्र येणे गरजेचे असते. सतत ब्रेकअप होत असलेल्यांनी आपले संबंध काय ठेवण्यासाठी किंवा सुरक्षितपणे त्याचा शेवट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. जर तुमचा पार्टनर अगदीच प्रामाणिक असेल तर तो नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करेल. नाही तर अगदी सुरक्षितपणे त्या नात्याचा शेवट करेल. प्रत्येक जोडीदाराच्या मानसिक आरोग्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे, असेही माँक म्हणाल्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात घरातील दुर्गंधीपासून सुटका; 'ह्या' सोप्या उपायाने