तानसेन गायला लागला की हरणे बाजूला येऊन मंत्रमुग्ध होत असत म्हणे!
अशीच घटना काल घडली!
माझं आणि बायकोचे जोरात भांडण चालू होतं!
बायको चिडून चिडून माझा उद्धार करत होती!
तेवढ्यात आमची शेजारीण बाल्कनीत येऊन जोरात गाऊ लागली,
"कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे...
तब तुम मेरे पास आना...
मेरा घर खुला है, खुला ही रहेगा...
तुम्हारे लिए...."
जादूची कांडी फिरवल्यासारखी बायको शांत झाली,
बाल्कनीचं दार आपटलं, आणि किचनमधून चहा भजी घेऊन आली!
संगीताची ताकद, दुसरं काय?