Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

नवऱ्याची २१ कर्तव्ये

jokes
, सोमवार, 24 मार्च 2025 (13:49 IST)
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे.
 
०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन बंद करणे.
 
०३. डोअरबेल अटेंड करणे.
 
०४. उंचावरचा डबा काढून देणे.
 
०५. डब्याचं झाकण उघडून देणे.
 
०६. सॉसच्या बाटलीचं बुच ओपनरने उघडून देणे
 
०७. घरात पाल, झुरळ इत्यादी डायनासोर्स पेक्षा भयंकर वन्य प्राणी मारुन घराबाहेर टाकणे.
 
०८. नविन गॅस सिलेंडर शेगडीला लावून देणे.
 
०९. सांगितलं तरंच मुलांना रागावणे, संभाळणे.
 
१०. पेपर आल्यावर लगेच न वाचणे, शब्दकोडं न सोडवणे.
 
११. बाहेर पडतंच आहात, तर 'ह्या खतरनाक वाक्यानंतर', दिलेल्या यादीनुसार सर्व वस्तू आणणे.
इतर मराठी जोक्ससाठी येथे क्लिक करा
१२. कपडे इस्त्रीला देणे, आणणे. गिरणी वरुन दळण दळून आणने
 
१३. बिलं भरणे, बँक व्यवहार संभाळणे.
 
१४. महिन्याचं सामान मॉलमधून आणतांना पिशव्या उचलणे, पेमेंट करणे.
 
१५. शॉपिंग करतांना मॉलमधे तासनतास, निरर्थक, न कंटाळता मागेमागे फिरणे, इशारा होताच चपळाईने पेमेंट करणे.
 
१६. सासरचे पाहुणे येऊन जाईपर्यंत घरात पडेल ते काम करणे, शहाण्या मुलासारखं वागणे.
 
१७. घरातली प्लंबिंग, इलेक्ट्रिकची छोटीमोठी कामं करणे.
 
१८. वारंवार जमिनीवर पडणारा रिमोट, जरासंधासारखा परत-परत जिवंत करणे (दुरुस्त करणे)
 
१९. घरचं वाहन असेल तर वाहनचालकाची भूमिका न कंटाळता पार पाडणे.
 
२०. वाहन नसेल तर भाड्याची गाडी ऑनलाईन बुक करणे, इत्यादी इत्यादी.
 
आणि
 
२१. 'मलाच मेलीला घरातील सर्व कामे करावी लागतात. एकाची मदत होत नाही' असे वाक्य ऐकून शांत बसणे.

-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sikandar Trailer: सिकंदर'चा ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता