Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चायनीज चिकन रेसिपी

Chinese chicken
, सोमवार, 6 जानेवारी 2025 (14:40 IST)
साहित्य-
बोनलेस चिकन - 500 ग्रॅम
वाइन - दोन टेस्पून
सोया सॉस - दोन चमचे
तीळ तेल - दोन चमचे
कॉर्न फ्लोअर - दोन चमचे
लाल मिरची पेस्ट - दोन टीस्पून
व्हिनेगर - एक टीस्पून
साखर - दोन टीस्पून
आले पेस्ट - एक टेबलस्पून
हिरवे कांदे - चार
शेंगदाणे - 100 ग्रॅम
शिंगाडे - चार एकए

कृती-
सर्वात सर्वात आधी एका बाऊलमध्ये वाइन, सोया सॉस आणि तेल घालून चांगले मिक्स करावे.त्यानंतर कॉर्न फ्लोअर मिक्स करून द्रावण तयार करा, त्या द्रावणात चिकन मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे. आता कॉर्न फ्लोअरमध्ये स्वतंत्रपणे वाइन, सोया सॉस, तेल, मिरची पेस्ट, व्हिनेगर आणि साखर घालून पेस्ट तयार करावी. आता या पेस्टमध्ये हिरवा कांदा, लसूण, उकडलेले शिंगाडे आणि भाजलेले शेंगदाणे घालून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट पॅनमध्ये ठेवा आणि 10-15 मिनिटे शिजवावे. शिजल्यानंतर मॅरीनेट केलेले चिकन पॅनमध्ये ठेवावेव. आता चिकन चांगले शिजल्यावर कांद्याची पात बारीक चिरून चिकनवर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली चायनीज चिकन रेसिपी, नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा