Article Marathi Poetry %e0%a4%98%e0%a4%b0 107102000004_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घर

घर
NDND
मोत्याचा सार खळ्कन तुटावा
तसे तिचे हसू
कोपर्‍याकोपर्‍यात विखुरले,
घरातील चैतन्य
सर्वांगानी उमलून आले

जिव्हारी घाव घालणार्‍या
'त्या' प्रसंगाने
जेव्हा तिचे अश्रू अनावर झाले,
तेव्हा याच घराच्या भिंतींनी
मूकपणे तिला सावरले

webdunia
NDND
हसू ‍आणि आसू यांच्या
बहुरंगी आविष्काराने
घर कधी उजळले तर कधी झाकळले
पर एक मात्र खरे,
घराचे घरपण
नेहमीच कायम राहिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi