तिला साद घालीत होतोविरह वेदना मला जाळीत होत्या.अखेर दमलोडोळे मिटून, डोके दाबून बसलो मात्रक्षण-दोनच क्षण-अनअकस्मात ढगांचा गडगडाटऐकू येऊ लागलाविजा चमकू लागल्यावादळ वारे वाहू लागलेदारं खिडक्या यांची तावदानंआत बाहेर होऊ लागलीतअन... अन ती आलीमला कडकडून भेटली
अन लेखणी सरसावून
मी लिहायला सुरुवात केली
भराभर लिहू लागलो.
आता ती आली आहे ना!
तीच जिची मी
आतुरतेने वाट पहात होतो
ती आली...
ती स्फुर्ती आली.