ज्याची वाट बघत अख्ख वर्ष जाई,
तो आलाय जवळ, तर निघाली आहे सफाई,
घासून पुसून घरदार कसं लख्ख करा,
दिवाळीच हसतमुख सारे स्वागत करा,
रांगोळी, तोरणा ने सजवा, आकाशदिवे अंगणी.
खुसखुशीत फराळाची होऊ द्या मेजवानी,
हसण्या खिदळण्या चे आवाज पडुदेत कानी,
हीच तर खरी आहे गड्या आंनद पर्वणी,
खूपच आसुसले होते सारेजण, मुकले होते,
काहीतरी सुटून गेलं असं च सतत वाटत होते,
चला तर मग मंडळी, व्हावे तुम्ही सज्ज सारे,
दिवाळी चे जोरदार स्वागत सारेच करू रे!!
..अश्विनी थत्ते