जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार,
आनंदाला नसतो तिथं कधी पारावर,
किलबिलाट असतो बघा फांदो फांदी,
प्रत्येक नात्याची असते चांदीच चांदी,
लहानसानांचे कौतुक मोठ्यांनी करावें,
लहानां करवी आदर मोठ्या चे व्हावे,
सण समारंभ होतात मोठ्या दणकून,
घराचा कोपरा न कोपरा जातो उजळून,
कमीजास्त होणं आपचं सहन करतात,
कोठेही सामावून जाणं, लिलया जमतात,
एकमेकांना ऐकू येते एकमेकां ची साद,
गोंगाट असला तरी, घरातून निघतो एकच नाद!
असा आहे परिवारात राहण्याचा महिमा,
कालबाह्य होतं आहे हे शल्य, नष्ट होतेय गरीमा!
....अश्विनी थत्ते.