Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

Mother's Day Poem "आई" ही दोनच अक्षरे

aai kavita

©ऋचा दीपक कर्पे

, रविवार, 9 मे 2021 (09:53 IST)
"आई"
ह्या दोन अक्षरांत
संपूर्ण विश्व सारा संसार
हेच दोन अक्षर
प्रत्येक जीवाचा आधार
 
धरणी आई प्रेमळ
जन्मदात्री, पोसणारी
मायेचा प्रेमळ हात
जग अंकात सामावणारी
 
सहनशील, मायाळू
भरभरून देणारी
मोबदल्यात कुणाकडून
काहीच न घेणारी
 
जगातील प्रत्येक आई
ह्याच धरणीचा अंश
सोसून सारे दुःख कष्ट
वाढवते कुटुंबाचा वंश
 
"आई" ही दोनच अक्षरे
अशक्य वर्णन कराया
आई म्हणजे अस्तित्व
घडवते लेकरांचा पाया
आई म्हणजे आत्मा
आई म्हणजे देव
आईच्या श्रीचरणी
सदैव मस्तक ठेव
सदैव मस्तक ठेव...!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

History of Mothers Day : मातृदिन साजरा करण्याची परंपरा केव्हा, का आणि कशी सुरू झाली