"पीत" "केशरी" वलय नलिका
"पाक" जिचा स्थायी भाव,
लग्न भोजनी अजुनी मिरविते
"जिलेबी" तिचं नाव !!!
चंद्ररुपेरी वर्ख वदनी
मावाजडित जिची काया,
रंगीत वसनी "बर्फी" सुंदरी
जरा जपून खा तू राया !!!
पिवळे धम्मक कण मोत्यांचे
गळती झार्यातुनी पाकात,
गोल, लडदू बुंदीलाडू
सत्वर आणतो पाणी मुखात !!!
साखरेत घोळवा, पाकात बुडवा
करा गोल अथवा दंडगोल,
"गुलाबजाम" परी तोच रहातो
मिरवित आपला राजस डौल!!!
पक्वानांच्या सौंदर्यांमध्ये
नित्य ज्याची बोलवा,
लाल, हिरवा रंग लेऊनी
खुणवी डोळ्यास बदाम हलवा !!!
वरुन खडबडीत, आतून खडबडीत
गडी दिसतो पिवळा जर्द,
"म्हैसूरपाक" म्हणती याला
हा तर पठ्ठ्या मिठाईतला मर्द!!!
श्रीकृष्णाचे नाव मिरवितो
थोडा दुर्मिळ आहे बाळ,
चव ज्याची वेड लाविते
असा "गुर्जर" "मोहनथाळ" !!!
धागा धागा गुंफगुंफुनी
आचार्याचे कसब मोजते,
श्वेतसुंदरी "सुतरफेणी"
जिभेवर ठेवता उगीच लाजते!!!
थरावर थर नाजूक तेचा
मुंबापुरीत ज्याचे मूळ,
पातळ असे जरी "माहीम हलवा"
चवीने जगास लावतो खूळ !!!
कैक मिठाया गोडगोजिर्या
हलवाई बनविण्या घाम गाळतो,
जिभाजिभांवर खवैय्यांच्या
गोड चवीचा रंग उधळीतो !!!
- सोशल मीडिया