Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेसिक शिक्षकांच्या भरतीसाठी 5000 पद

बेसिक शिक्षकांच्या भरतीसाठी 5000 पद
, बुधवार, 24 मार्च 2021 (15:46 IST)
Teacher Recruitment in UP : मिशन रोजगार अंतर्गत शासकीय प्रायमरी शाळांमध्ये 5000 शिक्षकांची भरती केली जाईल. हे पद 69 हजार शिक्षक भरतीत रिकामे राहिले आहेत आणि यासाठी विभाग तिसरी मेरिट सूची काढणार. ही माहिती बेसिक शिक्षा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डा. सतीश चन्द्र द्विवेदी यांनी दिली आहे. त्यांनी म्हटले की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बेसिक शिक्षा परिषदाच्या शाळांमध्ये 1.25 लाख शिक्षकांची भरती केली आहे.
 
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की 69 हजार शिक्षक भरतीमध्ये योग्य उमेदवारांची मेरिट यादीत जाहीर केली गेली होती. या मेरिट यादीत आता दोन चरणांमध्ये सुमारे 64 हजार शिक्षकांची भरती झालेली आहे. आता तिसरी यादी जाहीर केली जाईल. त्यांनी म्हटले की 69 हजार शिक्षक भरतीमध्ये 1133 असे पद आहे जे आरक्षित जनजाति साठी आरक्षित आहे परंतू लिखित परीक्षेत या पदांसाठी योग्य उमेदवार मिळत नाहीये. 
 
आता नियमानुसार अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी भरती केली जाईल. यासाठी न्याय विभागाकडून सल्ला घेतला जात आहे. सल्ला मिळाल्यावर आम्ही भरतीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करू. एसटीसाठी सुमारे 1380 पद आरक्षित होते परंतू या वर्गाचे सुमारे 250 परीक्षार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशा प्रकारे दुपट्टा न घेता कुर्त्याची स्टाईल करा