Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'तो' हार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून सीआयडीला सुपूर्द

'तो' हार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून सीआयडीला सुपूर्द
, मंगळवार, 23 मार्च 2021 (16:22 IST)
शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेला सोन्याचा हार दगडूशेठ गणपतीला अर्पण करण्यात आला होता. हा हार आता सीआयडीने जप्त केला आहे. समृद्ध जीवनचे महेश मोतेवार याने दगडुशेठ हलवाई गणपतीला सव्वा किलो सोन्याचा हार अर्पण केला होता. या हाराची किंमत  तब्बल 58 ते 60 लाखांच्या घरात आहे. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून संबंधीत सोन्याचा हार CIDकडे सुपूर्द करण्यात आला आहे. 
 
फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला महेश मोतेवार हा सध्या जेलमध्ये आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये शेळीपालन तसेच शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली होती. आर्थिक आमिष दाखवून मोतेवार याने अनेक शेतकऱ्यांची गंडा घातला होता. या फसवणुकीप्रकरणी अनेक ठिकांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. याच प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हा सोन्याचा हार सीआयडीने जप्त केला.
 
महेश मोतेवार याची चौकशी सीआयडीकडून सुरु आहे. याचदरम्यान, सोन्याचा हार  दिल्याचे छायाचित्रातून समोर आले. त्यानंतर अधिक चौकशीनंतर हा हार दगडूशेठ गणपतीला अर्पण केल्याचे समजले. सीआयडीने श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टशी  संपर्क साधला. त्यानंतर हा हार स्ट्रने सीआयडीकडे दिला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्र्यांवर अतिशय गंभीर आरोपानंतरही त्यांची साधी चौकशी नाही, शिवसैनिकांमध्ये नाराजी