हृदयात माझ्या हळवा एक कप्पा ,
माहेर नाव ज्याचं, समजायला सोप्पा,
उगीचच मन माहेरी धाव घेतं,
जरा उसंत मिळाली, की चक्कर मारतं,
कधी बालपण येतं धावत धावत,
तर कधी भावंडा शी भांडण होतं,
अगणातला मोगरा, मनांत ही फुलतो,
पारिजाता चा सडा, ओचा भरतो,
मैत्रिणी सोबतचा डाव आठवे कधी,
दाट आई ची, काम कर तू आधी,
अभ्यास करतानाची झोप लागली न पुन्हा,
मनातच माझ्या हे सारे, कळे न कुणा!कळे न कुणा!!