Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Kavita एखादी व्यक्ती, अक्ख आयुष्य बदलवून टाकते

marathi poem
, बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (17:20 IST)
एखादी व्यक्ती, अक्ख आयुष्य बदलवून टाकते,
कधी आपलं खूपच चांगलं, कधी खुप वाईट होतें,
एखाद्या घटनेच ही तसंच कधी असतं,
चांगले वाईट पडसाद उमटतात, सर्व चित्र बदलत,
क्षण एखादा, आत्ता आत्ता पर्यंत सर्वच जवळ असतं,
दुसऱ्याच क्षणाला डोक्यावरून पाणी गेलेलं दिसतं,
दिवस एखादा चांगल्या गोष्टीसाठीच राखीव असतो,
वाईटांची मालिकाच एखादा दिवस घेऊन उजाडतो,
प्रचंड ताकत असते अश्या या एखाद्या मध्ये,
चांगलं वाईट दडलेले असतं त्या सर्वांमध्ये!!
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Beauty Tips : कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करा