Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

Marathi Kavita : प्रत्येक नातं जपावं

family
, सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (13:58 IST)
प्रत्येक नातं जपावं न  ते आहे तसं,
जगून घ्यावं न ते, ते आहे जसं,
कृत्रीम पणा नकोच त्या जगण्यात,
आहे तसेच स्वीकारलं, की आनंद स्वीकारण्यात,
आहे त्यास बदलवल ,की गोडवा निघून जातो,
नात्यांचा चोथा मात्र आपल्या हाती लागतो,
कारण नाती निवडता येत नाहीत,
ते प्रारब्धात आहे तेच तर संचित,
खुलवलं त्यास की ते खुलतात खूपच,
नाहीतर अंतर्मुख होतात,होतात गूढ उगाच.
बघा काय जमतं तुम्हांस, काय करू शकता,
जमवायचं ठरवलं की सगळेच सर्व करू शकता!..
...अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डेंग्यूपासून बरे होण्यासाठी सोपी योगासने