Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Marathi Kavita स्वयंपाकघर म्हणजे, एक अशी जागा

Kitchen
, मंगळवार, 10 जानेवारी 2023 (12:18 IST)
स्वयंपाकघर म्हणजे, एक अशी जागा, 
जोडून ठेवी घरातील प्रत्येक नात्यातील धागा,
प्रत्येकाच्या आवडी निवडी जपणार मन इथं वसत,
घरातील कित्येक वादळ पण इथंच शमत,
जो तो डोकावतो येता जाता इथं आपुलकीनं,
घरातील स्त्रीचा हात इथं फिरतो ममतेन,
सगळ्या चवी इथं चवीचवीने बनवतात,
खाणारे ही ते ढेकर देऊन, तृप्तीनं खातात,
घरातील तंबूचा मधला खांब तो असतो,
त्याच्या विना घराचा तोल कोण सांभाळू शकतो?
..अश्विनी थत्ते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in B.Tech in Food Technology: बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, शीर्ष महाविद्यालय, व्याप्ती ,पगार जाणून घ्या