शब्दांना तुझ्या अर्थ देते
स्वप्नांना तुझ्या रंग देते
भासांना ही मूर्त करते
क्षणा क्षणाला जिवंत करते
तुझी कविता .....
मन हे माझे जिंकूनी घेते
भावने चा उद्रेक करते
मनात आशा भरुनी जाते
रंग चहुकडे विखरून जाते
तुझी कविता ....
तुझेच अनुभव रंग तुझे
तुझीच प्रेरणा छंद तुझे
मुक्त तू स्वच्छंद तू
क्षणा क्षणाला जगतोस तू
तुझी कविता