Publish Date: Mon, 12 Oct 2020 (16:22 IST)
Updated Date: Mon, 12 Oct 2020 (16:25 IST)
आयुष्यात संपर्कात येतं कुणी न कुणी,
काही खूप जवळ येतात, काहींच्या फक्त आठवणी,
काही भेटतात, भेटून आपलंसं करतात,
काही येतात अन कासावीस करून जातात,
येता क्षणी "त्या" खट्ट वाजत काळजात,
आपल्या नव्हेत ह्या ते चटकन कळतात,
असं वाटतं लगेचंच दूर व्हावं आपण,
नाहीच न त्या आपल्या, हे समजतं मन,
नकोत पुनः कधी येणं त्यांचं आयुष्यात,
न भेंटण व्हावं त्यांच्याशी भविष्यात!!
...अश्विनी थत्ते.