Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 5 फायदेशीर योगासने

मधुमेहाच्या रुग्णांसाठी 5 फायदेशीर योगासने
, सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (15:44 IST)
मधुमेहाच्या रुग्णांनी रक्ताच्या पातळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी हे काही योगासने करावी. आजच्या काळात आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच स्वतःसाठी पुरेसा वेळ न दिला गेल्यामुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाचे रुग्ण वाढतंच चालले आहेत. मधुमेहाच्या रुग्णांना आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर मधुमेहाचा त्रास उद्भवतो. मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काही योगासने केले पाहिजे. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत की मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेच्या पातळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या योगासनांचा सराव करायला पाहिजे. 

* बालासन - 
मधुमेहाच्या रुग्णांना नियमितपणे बालासनाचा सराव केला पाहिजे. बालासनाचा सराव केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. बालासन योगाचा सराव केल्यानं खांदा आणि कंबर दुखणे कमी होत. दररोज बालासन केल्यानं पचन तंत्र देखील बळकट होतं.
 
* सेतू बंधासन - 
सेतू बंधासन योग केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमितपणे सेतुबंधासनाचा सराव केला पाहिजे. सेतुबंधासन योगाचा सराव केल्यानं उच्च रक्तदाबाच्या त्रासात देखील आराम मिळतो.
 
* सर्वांगासन - 
आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज सर्वांगासनाचा सराव करावा. मधुमेहाच्या त्रास असल्यास सर्वांगासनाचा सराव फायदेशीर असतो. नियमानं सर्वांगासनाचा सराव केल्यानं कंबरेच्या दुखण्यापासून सुटका होते. सर्वांगासनाचा सराव केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
 
* हलासन - 
हलासन योगाचा सराव मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम मानला जातो. हलासनाचा नियमितपणे सराव केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज हलासनाचा सराव करावा.
 
* प्राणायाम -
शरीरास निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी दररोज प्राणायाम करावं. नियमितपणे प्राणायाम केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
 
* हा लेख निव्वळ आपल्या माहितीसाठी आहे. आपण एखाद्या आजाराने ग्रस्त असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोध कथा : जश्यास तशे