तू हसताना दिसलीस ना, की मी आपसूकच हसते,
तू न सांगितले तरिही तुझ्या खुशीत खुश होते,
कारण तुझे डोळेच मला सांगतात, सर्व कहाणी,
कधी तू हसतेस अन कधी येई डोळ्यात पाणी,
पण हसू अन आसू, दोन्हीही अंग जीवनाचे,
येतात आयुष्यात हे रंग, त्यांच्या संग जगायचे,
म्हणून तर तुला सर्वतोपरी तयार मी केलय,
सुखदुःखात कस जगायचं त्याच कसब शिकवलंय,
आता काळजी नाही मला तुझी गे लेकी,
सावरून चाल ताल जीवनात, जप आपुलकी!